पंढरपूर (सोलापूर) - कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या गाभार्यात व मंदिरात गाभाऱ्यात रंगबेरगी फुलाची सुंदर व मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे. यामुळे मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजला असून. आजची सजावट पुण्याचे भाविक राम जांभुळकर यांच्या तर्फे आहे.
पांडुरंगाच्या चार मोठ्या वाऱ्यांपैकी एक असणारी कार्तिकी वारी गुरुवारी आहे. कार्तिकी एकादशी निमित्ताने रंगीबेरगी, सुंदर व मनमोहक अशा फुलांनी संपूर्ण मंदिर सजवले आहे. देवाचा गाभारा, सोळखांभी मंडप, चौखांबी मंडप, नामदेव पायरी, उत्तर-दक्षिण दक्षिण द्वार लाल व पिवळ्या जलबेरा फुलांनी सजवले होते. मंदिर समितीने फुलांमध्ये विठ्ठल आणि रूक्मिणीचा गाभारा कर्मचार्यांकडून सजवून घेतला आहे. विठुरायाच्या गाभार्यात सोनचाफा, मोगरा आणि इतर सुगंधी फुले, पानांची सजावट करण्यात आली आहे.
26 नोव्हेंबर रोजी गुरुवार पहाटे एक वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा मंदिर समितीच्या सदस्यांच्या हस्ते केली जाईल. त्यानंतर दोन वाजून २० मिनिटे ते तीन या वेळात श्री विठ्ठलाची तर तीन ते साडेतीन या वेळात श्री रुक्मिणी मातेची महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्निक होईल. त्यानंतर पवार यांच्या हस्ते मानाच्या वारकऱ्यांचा आणि मंदिर समितीच्या वतीने पवार यांचा सत्कार होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मानाचे वारकरी दाम्पत्य यासह विठ्ठल मंदिर कर्मचारी व सदस्य असे 25 जणांना मंदिरात उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.