ETV Bharat / state

Ashadhi Wari 2023 : संगीताचे शिक्षण नसतानाही चिमुरड्या भाऊ-बहिणीचे भजन वारकऱ्यांना करते मंत्रमुग्ध - bhajan singing

पंढरपूरच्या वारीमध्ये वृद्धांपासून ते बालकांपर्यंत सर्व वारकरी येत असतात. या वारीमध्ये अनेकजण आपल्या घरच्या परिस्थितीला तोंड देत यश मिळावे म्हणून विठू रायाकडे मागणी करतात. तर काही जण आपल्या कलेने देवाची आराधना करतात शिवाय आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहही भागवत असतात. हिंगोलीमधील अशीच तीन भावंडे आहेत. जे भजन गात आपला उदरनिर्वाह करतात आहेत. संगीताचे कोणतेही शिक्षण न घेता या भावंडाच्या भजनात वारकरी मंत्रमुग्ध होतात.

भाऊ बहिणीचे भजन वारकऱ्यांना लावतेय वेड
भाऊ बहिणीचे भजन वारकऱ्यांना लावतेय वेड
author img

By

Published : Jun 30, 2023, 9:49 AM IST

सोलापूर : वारी जशी आध्यात्म्याची असते तसे कलेची सुद्धा असते. याच वारीत कलेची साधना तेवढ्याच निष्ठेने केली जाते. वारीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये लहान थोर गोरगरीब सगळेच सहभागी होत असतात. संताने म्हटलेले आहे. "यारे यारे लहानथोर याती. भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कुणाची", संताच्या या वचनाप्रमाणेच हिंगोली जिल्ह्यातील एक कुटुंब आहे. जे कुठल्याही संगीताचे प्रशिक्षण न घेता सुद्धा वारकऱ्यांना मंत्रमुग्ध करत आहेत. अवघ्या 2 वर्षाचा बालाजी 10 वर्षाची दिव्या आणि 12 वर्षाची विद्या ही बहीण भावंडं आपल्या कलेने आपलं घर सांभाळत आहेत. आपल्या परिस्थितीला झुंज देत दरवर्षी न चुकता वारी करत आहेत.

पखवाद अन् भजनाची कुटुंबाला साथ : एखाद्या प्रशिक्षित कलाकाराला ढोलकी वादकाला सुद्धा मागे टाकेल, अशी पाखवाद वादक हा बालाजीने वारी केली. त्यांच्या दोन बहिणी त्याला गायनाची साथ देत आहेत. यांच्या भजनात वारकरी मंत्रमुग्ध होत आहेत. विशेष म्हणजे या तिघांचे वय हे 15 वर्षाच्या खाली आहे आणि तिघांपैकी एकानेही संगीताचे शिक्षण घेतलेली नाही. बालाजी दत्ता भारती वय 7वर्ष, इयत्ता 2 रीत शिक्षण घेते. दिव्या दत्ता भारती वय 12 वर्ष इयत्ता 7वीमध्ये शिक्षण घेत आहे. विद्या दत्ता भारती वय वर्ष 10, अशी बहीण भावंडांची नावे आहेत. वडिलांच्या अपंगत्वामुळे घरची परिस्थिती बिकट. परंतु या तिघा बहिण-भावाने छोटे-छोटे कार्यक्रम करून आपले घर सावरले आहे. खऱ्या मातीतल्या टॅलेंटला आपल्या या परिस्थितीशी झुंज देत ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

वारकऱ्यांना आवडतात भजन : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील दिग्रस वंजारी या मूळ गावचे हे रहिवासी आहेत. दोन वर्षापासून हे तिघे वारीला येत असतात. या वारीदरम्यान ते आपल्या अंगी असलेली कला सादर करत संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरपर्यंत येतात. त्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे छोटे-मोठे कार्यक्रम आवर्जून करत असतात. त्यांचे भजन ऐकण्यासाठी लोकं अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आयोजित करतात. दत्ता भारती आणि बेबी दत्ता भारती या आई-वडिलांच्या आशीर्वादाने हे सगळे या वारीत सहभागी होतात. आई -वडीलही त्यांच्यासोबत असतात. संगीताचे कुठलेही शिक्षण न घेता एखाद्या निशांत पंडितासारखं पाखवाद वादन बालाजी करतो. तर एखाद्या स्वरसम्राज्ञ गायिकासारखे गायन या दोन्ही बहिणी करतात. या तिघांना हे गुण उपजत मिळाले आहेत. वारीत असलेल्या या तिघांचे भजन ऐकून वारकरी मंत्रमुग्ध होतात.

कलेने घराचा संभाळ : घरची परिस्थिती बिकटचे असल्याने ते काही खासगी गाण्याचे कार्यक्रम सुद्धा घेतात. अख्ख कुटुंबाचा उदरनिर्वाह हा या बहीण भावांच्या कला साधनेवर अवंलबून आहे. भक्ती भाव आणि देवाची आवड त्याचबरोबर आपला उदरनिर्वाह व्हावा म्हणून हे सगळेजण दरवर्षी वारीत न चुकता सहभागी होतात. वारीतल्या लोकांना त्यांची सवय झाल्याने ते सुद्धा त्यांचे कार्यक्रम आयोजन करून थोडं बहुत मानधन देतात. घरात शेती नाही, वडील मजुरी करून काम करायचे परंतु पायांच्या नसा ब्लॉक झाल्याने त्यांचे काम बंद झाले. तर बालाजीला मिरगीचा त्रास आहे. अशा परिस्थितीतून वाट काढत हे तिघेजण आपल्या कलेने घर संभाळत आहेत.

संधीची गरज : दिव्याला संगीताची आवड आहे, संगीत शिकायचे पण संधी नाही. शहरी भागात असेल मोठ्या मेट्रो शहरात असेल वेगवेगळे लहान मुलांचे टॅलेंटेड शो निर्माण केले जातात. त्यातून शहरातल्या टॅलेंट शोधण्याचा त्यांना संधी देण्याचा लवकर प्रयत्न होतो, परंतु खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात हे टॅलेंट खचून भरलेला आहे. ते फक्त जगासमोर येणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीच्या बोझ्याखाली दबलेल्या कलाकारांना मदत मिळणे गरजेचे आहे. समाजाने मदत केली तर हे टॅलेंट जगासमोर लवकर येईल. त्यामुळे समाजाने भरभरून मदत करणे सुद्धा गरजेचे आहे. महाराष्ट्रातील बहीण-भावाने संगीत क्षेत्रात मोठं नाव केल्याची परंपरा आहे. या भावंडांना संधी मिळाली आणि त्यांची कला जगासमोर आली. तर नक्कीच पुन्हा एकदा एका बहिण भावाच्या घराण्याची संगीत परंपरा तयार व्हायला वेळ लागणार नाही.

हेही वाचा -

  1. Ashadhi Wari 2023 : चंद्रभागेच्या तिरी लाखो भाविकांची गर्दी, भाविकांच्या गर्दीने फुलली विठ्ठू नगरी
  2. Ashadhi Ekadashi 2023: अनोखी भक्ती, विठुरायाच्या भक्तांनी प्रसादासाठी तयार केले 72 हजार लाडू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.