ETV Bharat / state

संचारबंदीत जोपासली 'कला'; माढ्यातील 'आसिफ'ने हुबेहुब रेखाटले कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय

author img

By

Published : Apr 25, 2020, 10:33 AM IST

आसिफ आतार यांनी आपली कला संचारबंदीतदेखील तेवतच ठेवली आहे. पोस्टर कलर, कलर पेन्सिल, ब्लॅक पेन्सिलच्या माध्यमातून त्यांनी उत्कृष्ट चित्र रेखाटण्याचे काम सुरुच ठेवले आहे. आतापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदी नेत्यांचे हुबेहुब फोटो रेखाटले आहेत.

sharad
आसिफ गनी आतार

सोलापूर - संचारबंदीत रिकामा वेळ घालवण्यापेक्षा त्याचा सदुपयोग करत माढ्यातील आसिफ गनी आतार या शिक्षकाने कलेशी एकरूपता दाखवली. कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचे हुबेहुब चित्र त्यांनी रेखाटली आहेत. त्यांच्या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

sharad
आसिफ आतार यांनी रेखाटलेले छत्रपती शिवाजी महाराज

माढ्यातील आतार हे कुर्डूवाडीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेत कला शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. आसिफ आतार यांनी आपली कला संचारबंदीतदेखील तेवतच ठेवली आहे. पोस्टर कलर, कलर पेन्सिल, ब्लॅक पेन्सिलच्या माध्यमातून त्यांनी उत्कृष्ट चित्र रेखाटण्याचे काम सुरुच ठेवले आहे. आतापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते दादासाहेब साठे, या राजकीय मंडळीसह रंग आयुष्याचे चार भाग, तसेच माॅर्डन आर्टच्या माध्यमातून भटकंती करत असलेल्या समाजाचे चित्रण, हातावरचे पोट असलेला मदारी समाज, नर्तकी यासह अन्य चित्रे हुबेहुब काढली आहेत.

sharad
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आसिफ यांच्या कलेची सर्वत्र वाहवा होत आहे. घरातच बसून आसिफ आतार हे विविध चित्रे काढण्यात दंग असल्याचे दिसत आहे. बालवयापासूनच आतार यांना चित्र रेखाटण्याचा छंद होता. त्यांनी कलेशी एकरुपता ठेवली असून कला जपण्यासाठी त्यांनी वर्क फ्राॅर्म होमच्या माध्यमातून कलाविष्कार सादर केला. त्यांनी घरातच बसण्याचा सल्ला देखील दिला आहे.

sharad
ज्येष्ठ नेते शरद पवार

शाळेला सुट्टी असल्याने घरात टीव्ही व अन्य कामात गुंतण्यापेक्षा मी माझी कला जपून ठेवण्यासाठी चित्र काढली आहेत. इतरांनी देखील या संचारबंदीत वर्क फ्रार्म होमच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या अंगातील कलेचे सादरीकरण करत घरातच बसावे असे आवाहन आसिफ आतार यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.