ETV Bharat / state

राज्यस्तरीय बैठकीत सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७५.५४ कोटींची मिळाली वाढ

author img

By

Published : Jan 28, 2020, 9:51 AM IST

पुणे येथे सोमवारी जिल्हा नियोजनाची राज्यस्तरीय बैठक पार पडती. यामध्ये जिल्ह्याच्या 424.32 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

meeting
राज्यस्तरीय बैठक

सोलापूर- जिल्ह्याच्या 2020-21 च्या जिल्हा नियोजन आराखड्यात 75.54 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. या वाढीसह जिल्ह्याच्या 424.32 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. पुणे येथे सोमवारी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ही मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा- सोना अलॉईज मारहाण व खंडणी प्रकरण; छ. उदयनराजेंसह ११ जणांची निर्दोष मुक्तता

सोमवारी राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन येथे पार पडली. या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार बबन शिंदे, संजय शिंदे, राम सातपुते, सचिन कल्याणशेट्टी, यशवंत माने, रामहरी रुपनवर, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे यांची उपस्थिती होती.

शेवटच्या टप्प्यात जिल्ह्याला आणखी निधी मिळावा -
जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्याच्या 349.87 कोटी रुपयांच्या आराखड्यास रविवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली होती. कार्यान्वयीन यंत्रणांची मागणी लक्षात घेता राज्यस्तरीय बैठकीत 116 कोटी रुपयांची मागणी करण्याची पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले होते. त्यानुसार बैठकीत अधिकची मागणी करण्यात आली. मात्र, वित्तीय मर्यादा लक्षात घेता 74.45 कोटी रुपयांच्या अधिकचा निधी देण्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या वाढीव निधीबाबत पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी वित्तमंत्री पवार यांचे आभार मानले. मात्र, अर्थसंकल्पीय नियोजनाच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्याला आणखी निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी अजित पवार म्हणाले की, पुणे विभागात पुणे जिल्ह्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा आराखडा आहे. दिलेल्या वाढीव निधीतून कोणत्या विभागाला निधीची तरतूद करायची याबाबतचा निर्णय पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात यावा.

पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे
उजनी धरणातून सोलापूर शहराला थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे. यासंबंधित असणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पालकमंत्री, जलसंपदा मंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांची व्यापक बैठक बोलवण्यात येईल. या बैठकीस जिल्हा प्रशासन, सोलापूर महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एनटीपीसीशी संबंधित अधिकारी उपस्थित राहतील, असे पवार यांनी सांगितले.

पंढरपूर तीर्थक्षेत्र आराखड्यातील कामे गतीने होण्यासाठी पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी लक्ष घालावे, असे अजित पवार यांनी सांगितले.

Intro:mh_sol_03_dpc_424_core_7201168
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५ कोटींची वाढ
राज्यस्तरीय बैठकीत ४२४.३२ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता
सोलापूर-
 सोलापूर जिल्ह्याच्या सन २०२०-२१च्या जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. या वाढीसह जिल्ह्याच्या ४२४.३२ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. पुणे येथे सोमवारी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ही मान्यता देण्यात आली आहे. Body:सोमवारी राज्यस्तरीय बैठकी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन येथे पार पडली. या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे,  राम सातपुते, सचिन कल्याणशेट्टी, यशवंत माने, रामहरी रुपनवर, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे यांची उपस्थिती होती.
सोलापूर जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्याच्या ३४९.८७ कोटी रुपयांच्या आराखड्यास रविवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली होती. कार्यान्वयीन यंत्रणांची मागणी लक्षात घेता राज्यस्तरीय बैठकीत ११६ कोटी रुपयांची मागणी करण्याची पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले होते. त्यानुसार बैठकीत अधिकाची मागणी करण्यात आली. मात्र, वित्तीय मर्यादा लक्षात घेता ७४.४५ कोटी रुपयांच्या अधिकचा  निधी देण्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी  सांगितले. या वाढीव निधीबाबत पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी वित्तमंत्री पवार यांचे आभार मानले. मात्र, अर्थसंकल्पीय नियोजनाच्या शेवटच्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्याला आणखी निधी मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी अजितपवार म्हणाले, पुणे विभागात पुणे जिल्ह्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा आराखडा आहे. दिलेल्या वाढीव निधीतून कोणत्या विभागाला निधीची तरतूद करायची याबाबतचा निर्णय पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात यावा.

उजनी धरणातून सोलापूर शहराला थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे. यासंबंधित असणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पालकमंत्री, जलसंपदा मंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांची व्यापक बैठक बोलवण्यात येईल. या बैठकीस जिल्हा प्रशासन, सोलापूर महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एनटीपीसीशी संबंधित अधिकारी उपस्थित राहतील, असे पवार यांनी सांगितले.

पंढरपूर तीर्थक्षेत्र आराखड्यातील कामे गतीने होण्यासाठी पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी लक्ष घालावे, असे अजित पवार यांनी सांगितले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.