सोलापूर - जिल्ह्यात शिवसेनेच्या तिघांनी बंडखोरी केली आहे. शहर मध्य मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे, पंढरपूरातून समाधान अवताडे तर करमाळामधून विद्यमान आमदार नारायण पाटील यांची बंडखोरी कायम राहिली आहे.
हेही वाचा- सोलपूर : काँग्रेसचे शिवाजी काळुंगे 'नॉट रिचेबल'; राष्ट्रवादीच्या गोटात धाकधूक
सोलापूर शहर मध्य मतदारसंघात शिवसेनेचे महेश कोठे यांची बंडखोरी कायम आहे तर करमाळा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी बंडखोरी केलेली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. बार्शीची जागा शिवसेनेला सुटल्याने या मतदारसंघात भाजपचे राजेंद्र राऊत यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेकडून माजी मंत्री दिलीप सोपल हे उभे आहेत. पंढरपूरात काँग्रेसचे शिवाजीराव काळुगे, तर शिवसेनेचे समाधान अवताडे यांनी बंडखोरी केली असून पंढरपूरची जागा ही भाजप लढवीत आहे.
हेही वाचा- जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघासाठी ३७३ उमेदवारी अर्ज दाखल