ETV Bharat / state

Husband Plucked Wife Ear : भांडण विकोपाला; नवऱ्याने थेट बायकोचा उपटला कान - विजयालक्ष्मी जमादार

नवरा बायकोच्या भांडणात नवऱ्याने बायकोचे कान उपटून काढल्याची घटना घडली आहे. सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील उटगी गावात हा प्रकर घडला. या प्रकणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यता आला आहे. अंबजप्पा जमादार असे आरोपी पतीचे नाव असुन विजयालक्षी असे कान उपटलेल्या पत्नीचे नाव आहे.

Husband Plucked Wife Ear
Husband Plucked Wife Ear
author img

By

Published : Apr 7, 2023, 9:40 PM IST

सोलापूर : सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील नवरा बायकोच्या भांडणात नवऱ्याने बायकोचे कान उपटून काढल्याची घटना घडली आहे. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला आहे. शेजाऱ्यांनी सोडवासोडवी करून पीडित विवाहित महिलेला पुढील उपचारासाठी सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. नवऱ्याने रागाच्या भरात बायको विजयालक्ष्मी जमादार (वय 29 वर्ष,रा,उटगी,ता अक्कलकोट ,जि सोलापूर) याचा कानाचा गड्डा उपटून काढल्याने सोलापुरात एकच चर्चा सुरू आहे.

भांडणात कान उपटला : अक्कलकोट तालुक्यातील शहरापासून जवळच असलेल्या उटगी गावात विजयालक्ष्मी, अंबजप्पा या दोघा नवरा बायकोचे घरगुती वादातून भांडण झाले. अंबजप्पा जमादार याने रागाच्या भरात पत्नीचा कान धरून ओढल्याने कान तुटला आहे. नवऱ्याने रागाच्या भरात केलेल्या हल्ल्यात विजयालक्ष्मी जमादार या गंभीर जखमी झाल्या आहेत. दारू प्राशन करून पती अंबजप्पा जमादार हा पत्नीसोबत सतत भांडण करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अक्कलकोट तालुक्यातील रुग्णालयात प्रथमोपचार : अंबजप्पा जमादार मारहाण करताना, पत्नीने विजयालक्ष्मी जमादार हिने स्वतःला वाचवण्यासाठी आरडाओरडा केली होती. आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी धाव घेत दारुड्या पतीच्या तावडीतून विजयालक्ष्मीची सुटका केली. या झटापटीत अंबजप्पा जमादार याने पत्नी विजयालक्ष्मीचा कान ओढला. त्यात पत्नीचा कान तुटून पतीच्या हातात राहिला. पत्नीला अतिरक्तस्त्राव होत असल्याने शेजाऱ्यांनी ताबडतोब अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

विवाहिता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल : विजयालक्ष्मी हिला उपचारासाठी सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. कानावर शस्त्रक्रिया करून कान जोडण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी सुरू केला आहे. अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी पती अंबजप्पा विरोधात भा.द.वि.325 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित विवाहितेच्या पतीला अंबजप्पा जमादार याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केले आहे. या घटनेचा पुढील तपास अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.

हेही वाचा - Pune LokSabha By Elections : पुणे लोकसभा पोटनिवडणूक चंद्रकांत पाटलांनी लढवावी; आमदार रवींद्र धंगेकर यांचा टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.