सोलापूर - आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नुतन विद्यालय आष्टी येथील वरिष्ठ लिपिक रत्नदिप कांबळे सर हे आज संस्थेच्या विविध शाळांमध्ये ३१ वर्षांची प्रदिर्घ सेवा बजावून आज सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने श्री दिगंबर जैन गुरूकुल प्रशाला, सोलापूर येथे प्राचार्य आशुतोष शहा सर यांच्या हस्ते त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
३१ वर्षाची प्रदिर्घ सेवा
ते मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील ऐ.दी. जैन पाठशाळा संचलित नुतन विद्यालय येथे सेवेत होते. त्यांनी सोलापूर येथील जैन गुरूकुल तसेच संस्थेच्या इतर शाळांमध्ये अंत्यत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा बजावली आहे. जवळपास त्यांनी 31 वर्षे शिक्षण क्षेत्राला वाहून घेतले होते.
सामाजिक व धार्मिक कार्यात योगदान
शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाच त्यांनी सामाजिक व धार्मिक कार्यही सुरू ठेवले होते. समाजातील गोर-गरीब विद्यार्थ्यांना ते नेहमीच सर्व प्रकराची मदत करत असत. स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते नेहमी पुस्तक रुपात मदत करतात. त्याच पद्धतीने विविध धार्मिक कार्यात ही त्यांचा सहभाग असता. लहान मुलांना बुद्ध वंदना पाठांतर व्हावे म्हणून ते बौद्धांचा दानमय बुद्ध विहारामार्फत बुद्ध वंदनेचे पुस्तके छापून लहान मुलांमध्ये वितरीत करत. समता सैनिक दल, विद्वत्त सभा या संस्थाच्या माध्यमातूनही ते सक्रिय आहेत.
वाढदिवस व सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
सेवानिवृत्ती व वाढदिवस एकाच दिवशी आल्याने कोरोना नियमांचे पालन करुन मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना या सेवाकाळात सन २०१० मध्ये सेवाभावी कर्मचारी हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.