ETV Bharat / state

Ujani Dam Water : उजनीच्या पाण्याचा वाद पेटला; अजित पवार व दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात सर्वपक्षीय सिद्धेश्वर चरणी महाआरती - उजनी धरण पाणी व्यवस्थापन

इंदापूर (पुणे) तालुक्यातील लाकडी-निंबोडी या उपसा सिंचन योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून पाणी देण्यास राज्यशासनाने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्णयाचा सोलापुरातून कडाडून विरोध केला जात ( Ujani dam water issue ) आहे.

Ujani Dam Water
सिद्धेश्वर चरणी महाआरती
author img

By

Published : May 16, 2022, 5:03 PM IST

Updated : May 16, 2022, 5:36 PM IST

सोलापूर - इंदापूर(पुणे) तालुक्यातील लाकडी-निंबोडी या उपसा सिंचन योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून पाणी देण्यास राज्यशासनाने मंजुरी दिली आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही योजना जुनीच आहे, त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये अशी सोलापूरकराना विनंती केली होती. राज्यपातळीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची बाजू घेतली आहे. या पार्श्वभूमीवर उजनीच्या पाण्याचा प्रश्न सोलापुरातील सर्वपक्षीय नेत्यांनी उचलून धरला आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापुरातून कडाडून विरोध केला जात आहे. ( All party Worship against Ajit Pawar and Dattatray Bharane )

अतुल खूपसे व पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात महाआरतीने आंदोलनाची सुरुवात - अतुल खूपसे यांच्या नेतृत्वाखाली उजनीच्या पाण्यासाठी सोलापुरात सर्वपक्षीय नेते एकत्र झाले आहेत. त्यांनी मोहोळमध्ये बैठक घेऊन आपल्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. सोमवारी सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांना सद्बुद्धी दे असे साकडे सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी घालण्यात आले.

पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले - फौजदार चावडी पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी अतुल खुपसे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना खरेतर बुद्धी नाही. उजनी धरणातील पाण्यावर सोलापूरकरांचा हक्क असताना ते पाणी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाकडे वळविले आहे. कारण पालकमंत्री दत्ता भरणे इंदापूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांना सद्बुद्धी मिळवण्यासाठी आम्ही आरती केली असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - कांद्याला भाव मिळत नसल्याने भरत जाधव यांनी नैराश्यातून केले विष प्राशन

Last Updated : May 16, 2022, 5:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.