पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक 17 एप्रिलला मतदान होणार आहेत. महाविकास आघाडीची उमेदवार दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ठरवणार आहेत. हा राष्ट्रवादीचा उमेदवार हा पंढरपूरकरांच्या मनातील उमेदवार असणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पंढरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पंढरपूर दैऱ्यावर आले होते.
शरद पवार यांच्या दोन सभा तर उद्धव ठाकरे यांची एक सभा होणार
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या 23 मार्चला अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. त्यानंतर राष्ट्रवादीकडून प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. येत्या दोन दिवसांमध्ये शरद पवार हे पोटनिवडणुकीत उमेदवारीची घोषणा करतील. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक मंत्री पंढरपुरात सभा घेणार आहेत. शरद पवार यांच्या दोन सभा होणार आहेत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टंसिंग फज्जा
पंढरपूर येथील श्रेयस पॅलेस कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला अजित पवार, जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. मात्र, यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून कोरोना बाबतीतील कोणते नियमांचे पालन होताना दिसले नाही. संपूर्ण मेळाव्यामध्ये अजित पवारांसह कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टंसिंग फज्जा उडवण्यात आला.
हेही वाचा - वीजबिलवसुलीविरोधात उपमुख्यमंत्र्यांना स्वाभिमानीचे निवेदन
हेही वाचा - आज सुटी नाही, सोलापूर जिल्हा निबंधक कार्यालये सुटीच्यादिवशीही राहणार सुरू