ETV Bharat / state

स्वामींना संधी म्हणजे योगी आदित्यनाथप्रमाणे यूपी पॅटर्न..

सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर या २ तुल्यबळ उमेदवारांशी महाराजांना २  हात करावे लागणार आहेत. त्यात त्यांच्या या राष्ट्रवादाचा किती निभाव लागेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

author img

By

Published : Mar 26, 2019, 8:19 AM IST

डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी

सोलापूर - भारतीय जनता पक्षाने सोलापूर लोकसभेच्या आखाड्यात यूपी पॅटर्न आणला आहे. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना डावलून लिंगायत धर्माचे गुरु डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांना सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात मैदानात उतरविले आहे. त्यामुळे सर्वांना तो योगी आदित्यनाथ प्रमाणे भाजपचा यूपी पॅटर्न वाटतो आहे.

डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी

सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना महाराजांनी कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता केवळ एक सेना भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात मोदींचे हात बळकट करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना सोबत घेऊन आपला उमेदवारी अर्ज साधेपणाने दाखल केला. त्यामागे काही हितचिंतकानां उघड न करण्याची रणनीती होती.

राष्ट्रकारण करण्यासाठी मी निवडणूकीच्या मैदानात उतरलो आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे सोलापुरातील उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दिली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ लिंगायत मतांवर डोळा ठेवून भाजपने त्यांना निवडणूकीत उतरविले आहे. विशेष म्हणजे त्याचे प्रतिस्पर्धी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आहेत.

Intro:सोलापूर : राष्ट्रकारण करण्यासाठी मी निवडणूकीच्या मैदानात उतरलो आहे.अशी प्रतिक्रिया भाजपचे सोलापुरातील उमेदवार डॉ जयसिद्धयेश्वर महास्वामी यांनी दिलीय. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ लिंगायत मतांवर डोळा ठेवून भाजपनं त्यांना निवडणूकीत उतरविले आहे.विशेष म्हणजे त्याचे प्रतिस्पर्धी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आहेत.

Body:भारतीय जनता पार्टीनं सोलापूर लोकसभेच्या आखाड्यात यूपी पॅटर्न आणलाय.विद्यमान खासदार शरद बनसोडेना डावलून लिंगायत धर्माचे गुरु डॉ. जयसिदेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात मैदानात उतरविले आहे.त्यामुळे सर्वांना तो योगी आदित्यनाथानंप्रमाणे भाजपचा यूपी पॅटर्न वाटतो आहेत.आज उमेदवारी अर्ज दाखल करताना महाराजांनी कोणतंही शक्तिप्रदर्शन न करता केवळ एक सेना भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला.या मेळाव्यात मोदींचे हाथ बळकट करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आले.त्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना सोबत घेऊन आपला उमेदवारी अर्ज साधेपणाने दाखल केला...त्यामागे कांही हितचिंतकानां उघड न करण्याची रणनीती होती.

Conclusion:सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर या दोन तुल्यबळ उमेदवारांशी महाराजांना दोन हात करावे लागणार आहेत.त्यात त्यांच्या या राष्ट्रवादाचा किती निभाव लागतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.