ETV Bharat / state

सोलापूर: लॉकडाऊन तोडाल तर कारवाई; बाहेर न पडण्याचे पोलिसांचे आवाहन

आपल्या निष्काळजीपणामुळे सोलापूरमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 12 एप्रिलला सोलापुरात पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर रुग्ण संख्या वाढतच गेली आहे.

Action will be taken against those who break the rules of lockdown in solapur
सोलापूर: लॉकडाऊन तोडाल तर कारवाई; बाहेर न पडण्याचे पोलिसांचे आवाहन
author img

By

Published : Jul 18, 2020, 4:37 PM IST

सोलापूर - आपल्या निष्काळजीपणामुळे सोलापूरमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 12 एप्रिलला सोलापुरात पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर रुग्ण संख्या वाढतच गेली आहे. जवळपास 5 हजार रुग्ण सोलापूर जिल्हा व शहरात झाले आहेत. ग्रामीण भागात अक्कलकोट, दक्षिण सोलापूर हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत.

कोरोनावर आजतागायत लस आली नाही. यामुळे एकमेव पर्याय म्हणून लॉकडाऊन लावण्याची वेळ सोलापूरच्या प्रशासनावर आली आहे. 16 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 26 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत सोलापुरात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला असून, त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती शहर व ग्रामीण पोलीस प्रमुखांनी दिली आहे. सोलापूर पोलीस आयुक्तांनी दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे संगितले आहे की, शहरातील जनतेने लॉकडाऊन कटाक्षपणे पाळले पाहिजे. विनाकारण बाहेर न येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, ग्रामीण भागातील 3 नगरपालिका व 36 गावात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन तोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. नाकाबंदीमध्ये वाहने जप्त करून खटले देखील चालवण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

सामाजिक अंतर ठेवा, वेळोवेळी हाथ स्वच्छ धुवा, मास्क वापरा, विनाकारण घराबाहेर पडू नका, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका असे आवाहन करून देखील नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुन्हा 10 दिवसांचे लॉकडाऊन ओढावून घेतला आहे. दररोज रुग्णसंख्या वाढतच गेली. 12 एप्रिलपासून सोलापूर शहरात व जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढतच गेली आहे. ही रुग्णसंख्य संख्या 5 हजाराच्या पुढे जात आहे. हे रोखण्यासाठी शेवटी लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.