ETV Bharat / state

क्रिकेट खेळताना गुप्तांगाला बॉल लागला; तरुणाचा मृत्यू

क्रिकेट खेळतांना ( playing cricket ) गुप्तांगाला चेंडू लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवारदुपारी तावशी येथे घडली. विक्रम गणेश क्षीरसागर ( Vikram Ganesh Kshirsagar ) राहणार नेपतगाव असे, मृत तरुणाचे नाव आहे.

विक्रम क्षीरसागर
विक्रम क्षीरसागर
author img

By

Published : Aug 7, 2022, 6:18 PM IST

पंढरपूर - क्रिकेट स्पर्धेदरम्यान क्रिकेट खेळत ( playing cricket )असताना नेपथगावच्या तरुण क्रिकेटपटूचा गुप्तांगाला चेंडू लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी दुपारी तावशी येथे घडली. विक्रम गणेश क्षीरसागर ( Vikram Ganesh Kshirsagar ) राहणार नेपतगाव असे मृत तरुणाचे नाव आहे.एका महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने तावशी तालुका पंढरपूर येथील माढा नदीच्या पात्रात क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या या स्पर्धेत निप्पदगाव येथील संघ सहभागी झाला होता.

हेही वाचा - Sunil Raut : 'संपूर्ण कुटुंबाला ईडीने अटक केली, तरी घाबरणार नाही; शिवसेना सोडणार नाही'

दरम्यान, काल दुपारी क्रिकेट खेळत असताना विक्रम क्षीरसागर हा फलंदाजी करत होता. तेव्हा गोलंदाजाने फेकलेला चेंडू विक्रम याच्या गुप्तांगावर जोरात लागल्याने विक्रम जागेवरच कोसळला. त्यावेळी त्याच्या मित्रांनी तातडीने त्याला उपचारसाठी पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार दरम्यान विक्रमचा मृत्यू झाला. विक्रमच्या आकस्मित निधनाने संपूर्ण नेपतगावावरती शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - Arvind Kejriwal : गुजरातमधील काँग्रेस लवकरच भाजपात विलीन होणार : अरविंद केजरीवालांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.