ETV Bharat / state

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक विहीर

सोलापूर शहरानंतर जिल्ह्यात सर्वात मोठी भिमजंयती वळसंग येथे साजरी केली जाते. परगावी गेलेले भिमसैनिक आवर्जून १४ एप्रिलला गावाकडे येतात.

author img

By

Published : Apr 14, 2021, 1:55 PM IST

Updated : Apr 14, 2021, 3:41 PM IST

विहिर
विहिर

सोलापूर- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्घाटन केलेली पाणी पुरवठ्याची ऐतिहासिक सार्वजनिक विहीर आणि परिसर आज ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची साक्ष देत आहे. मुंबई, पुणे, नागपूर या जिल्ह्याबरोबर बाबासाहेबांचा संपर्क सोलापूर बरोबर होता. आपल्या हयातीत डॉ बाबासाहेब आंबेडकर अनेकवेळा सोलापूरला येऊन गेले. 1921,1927, 1935, 1937, 1942, 1946 असे अनेकवेळा डॉ बाबासाहेब यांचे सोलापुरात येऊन गेल्याचे संदर्भ आढळतात. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने सजीव झालेली वळसंग येथील विहीर आजही साक्ष देत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक विहीर

विहिरीचे सुशोभीकरण करण्याची मागणी
वळसंग येथील ऐतिहासिक विहीर सुशोभीकरणासाठी अद्यापही शासकीय निधीच्या प्रतिक्षेत आहे. येथील दलित बांधवांनी श्रमदानातून उभारलेल्या विहीरीचे पुरातत्व खात्याने दखल घेतली पाहिजे. किंवा राज्य शासनाने शासकीय निधी उपलब्ध करून त्याचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1937 ला या विहिरीचे पाणी प्राशन केले
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे १९३७ पुर्वी दलित बांधवांनी स्वतःच्या वस्तीसाठी स्वतंत्र सार्वजनिक विहीर श्रमदान आणि लोकवर्गणीतून बांधली होती. त्याच सुमारास बाबासाहेब आंबेडकर सोलापूर जिल्ह्यात येणार असल्याची चर्चा होती.त्यामुळे जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर वळसंगला येऊन आडाच्या पाण्याला स्पर्श करीत नाहीत तोपर्यंत आडाचे पाणी कोणीही प्यायचे नाही असा पवित्रा येथील दलित बांधवांनी केला होता. अखेर तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते भुजंगप्पा रुई , तेजप्पा वाघमारे, ओंकारी गायकवाड,विजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून २४ एप्रिल १९३७ रोजी बाबासाहेब आंबेडकर वळसंग येथे आले. स्वातंत्रसैनिक गुरुसिध्दप्पा अंटद यांनी स्वत:ची बैलगाडी बाबासाहेबांच्या मिरवणूसाठी उपलब्ध करून दिली.मिरवणूकीनंतर बाबासाहेबांनी आडाचे पाणी शेंदून प्राशन केले. तेव्हापासून आजही येथील बांधव याच आडाचे पाणी पिण्यासाठी वापरतात.

भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते
सोलापूर शहरानंतर जिल्ह्यात सर्वात मोठी भिमजंयती वळसंग येथे साजरी केली जाते. परगावी गेलेले भिमसैनिक आवर्जून १४ एप्रिलला गावाकडे येतात. दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या स्थळाला भेट देऊन निधी देण्याची घोषणा केली. पण अद्यापही कागदी घोडे पुढे सरकले नाहीत, असे चित्र आहे.

Last Updated : Apr 14, 2021, 3:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.