सोलापूर - सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज 976 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 25 जणांचा बळी कोरोना विषाणूने घेतला आहे. आजपासून सोलापूर शहरासह जिल्ह्यात 15 दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. 'ब्रेक द चैन' अंतर्गत कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. कोरोना विषाणूने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने अखेर नवीन विद्युत वाहिनी सोलापूरच्या स्मशानभूमीत दाखल केली आहे. याबाबत मनपा उपायुक्त धनराज पांडे यांनी माहिती दिली.
हेही वाचा - भाजप नेत्यांकडून त्यांच्या आमदारांना गाजर दाखवण्याचे काम - उपमुख्यमंत्री
शहरात आज 307 नव्या रुग्णांची भर
सोलापूर शहरात आज 307 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यात 171 पुरुष, तर 136 स्त्रियांचा सामावेश आहे. 8 रुग्णांचा कोरोना आजाराने बळी घेतला आहे. मृतांमध्ये 5 पुरुष व 3 स्त्रिया आहेत. शहरात सद्यस्थितीत 3 हजार 772 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
ग्रामीण सोलापुरात आज 669 रुग्णांची भर
सोलापूर जिल्ह्याच्या विविध तालुक्यांत 669 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 415 पुरुष, तर 254 स्त्रिया आहेत. यांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे. कोरोना आजारावर उपचार घेत असताना ग्रामीण भागात 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 12 पुरुष, तर 5 स्त्रिया आहेत. 6 हजार ४ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
मृतांची संख्या वाढत असल्याने नवी विद्युत दाहिनी सुरू
कोरोना विषाणूने मृत झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मृत रुग्णांवर अंतिम संस्कार करताना मृतांचा खच वाढू नये यासाठी अक्कलकोट रोड येथील स्मशानभूमीत नवी विद्यूत दाहिनी सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी मृतांवर अंतिम संस्कार केले जात आहे.
हेही वाचा - माढात आजही डॉ. आंबेडकरांच्या अस्थी केल्यात जतन