पंढरपूर - वारकऱ्यांच्या आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवतांच्या मंदिराच्या संवर्धन विकास कामासाठी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये 74 कोटी रुपयांची तरतूद ( 14 Crore Sanctioned for Vitthal Temple Pandharpur ) केली केल्याची माहिती माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ( Gahininath Maharaj Ausekar ) यांनी दिली. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे ( Neelam Gorhe On Vitthal Mandir ) यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता यांच्या संवर्धन विकासासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत अनेकवेळा बैठका घेतल्या होत्या. तसेच आषाढी एकादशी 2021 कालावधीत त्या पंढरपूर येथे आल्या होत्या व सदरकामी बैठक घेऊन संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सुचना केल्या होत्या व कामांची पाहणी केली होती. संवर्धन विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निधी संदर्भात मागणी करण्यात आली होती.
गहिनीनाथ महाराजांची विनंती -
राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी 202-23 सालचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धन विकास कामासाठी 73 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना परिस्थितीमध्ये विठ्ठल मंदिर पूर्णपणे बंद अवस्थेत होते. त्यामुळे मंदिर समितीचे उत्पादनही त्याकाळात घट झाली. सद्यस्थितीत मंदिर समितीची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने सदर कामास शासनाने निधी मंदिर करून द्यावा, अशी विनंती गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केली होती.
श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे खूप जूने, ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्किटेक्चरल महत्व असणारे मंदिर आहे. मात्र, यामध्ये काळाच्या ओघात आणि नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे बरेच बदल झाले आहेत. अनेक ठिकाणी मंदिराचे बांधकाम दुरुस्तीला आले असल्याने गेल्या 50 वर्षापासून मंदिराचा विकास आराखडा प्रस्तावित होता. त्यास मुहुर्त लागत नव्हता. मात्र, कोरोना कालावधीत मंदिर सर्वकष विकास आराखडा तयार करणेकामी पुरातत्त्व विभागाच्या नामांकित सुचीतील वास्तुविशारदाची नियुक्ती करून आराखडा तयार केला व त्यास पुरातत्व विभागाची मान्यता घेऊन शासन मान्यतेसाठी सादर केला आहे. सदर आराखड्याची अंदाजपत्रकीय रक्कम 74 कोटी रुपये असून, यानुसार कामे पूर्ण झाल्यानंतर मंदिरास प्राचीन मुळ रूप प्राप्त होणार आहे.
हेही वाचा - '...मग मंत्र्यांनी आपल्या कार्यालयात दाऊदचा फोटो लावावा आणि महाराष्ट्रभूषण पुरस्कारही द्यावा'
या आराखड्यामध्ये विठ्ठल मंदिर व सभामंडप, रूक्मिणी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, नामदेव पायरी व नगारखाना, पडसाळ, स्माल टेंम्पल, विनायक मंदिर, व्यंकटेश मंदिर, टेन्साईल वर्क (आतील व बाहेरील), दर्शनबारी, स्ट्रक्चरल ऑडीट, वॉटर सप्लाय व ड्रेनेज, इलेक्ट्रीकल वर्क, साऊंड सिस्टीम, फायर फायटींग सिस्टीम, लक्ष्मण पाटील देवस्थान, अंबाबाई मंदिर, श्री.रोकडोबा मंदिर, श्री.सोमेश्वर मंदिर, श्री.विठ्ठल मंदिर सभामंडप सागवाणी काम, इतर परिवार देवता मंदिरे, कमान बांधकाम व इतर अनुषंगीक कामे प्रस्तावित आहे.