ETV Bharat / state

कासेगावात यल्लमादेवीची यात्रा; यात्रेसाठी ५ हजार जोगती दाखल

यल्लमा देवीची कर्नाटकमधील सौदंती, कोकटनूर, जत या ठिकाणी देवस्थाने आहेत. पंढरपूर तालुक्यातील कासेगावच्या यात्रेला जवळपास १०० वर्षांची मोठी परंपरा आहे.

author img

By

Published : Dec 25, 2019, 5:57 AM IST

solapur
कासेगावा यल्लमादेवीची यात्रा

सोलापूर- पंढरपूर तालुक्यातील कासेगावची यल्लमा देवी ही देशभरातील जग जोगत्यांची आराध्य दैवत आहे. कासेगावात यल्लमा देवीच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी कासेगावात गर्दी केली आहे. यात्रेत सहभागी होणारे जोगती हे यल्लमा देवीच्या यात्रेचे वैशिष्ट्य आहे.

माहिती देताना जोगती मंजीरी देशमुख

यल्लमा देवीची कर्नाटकमधील सौदंती, कोकटनूर, जत या ठिकाणी देवस्थाने आहेत. पंढरपूर तालुक्यातील कासेगावच्या यात्रेला जवळपास १०० वर्षांची मोठी परंपरा आहे. या यात्रेचा मान कासेगावच्या देशमुख घराण्याला आहे. देशमुख यांच्या पूर्वजण दृष्टांत झाल्याने यल्लमा देवीचे कासेगावात मंदिर बाधंण्यात आले. तेव्हापासून कासेगावात यल्लमा देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रातून येणारे जग आणि जोगती हे कासेगावच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, पंजाब आदी राज्यातून जवळपास १०-२० हजारापेक्षा अधिक जोगती यात्रेच्या निमित्ताने कासेगावात हजेरी लावतात. तसेच परंपरागत चालत आलेल्या आपल्या जागेवरच अनेक वर्षानुवर्षे जोगत्यांचे जग शिस्तीमध्ये विसावतात. यात्रेच्या काळात देशमुख आणि देशपांडे यांच्या घरी देवी माहेरपणाला येते. या ठिकाणी सर्वांचा मानपान होतो. यांनतर सर्व जग आणि जोगती यल्लमा देवीच्या पालखीच्या मागे गाव प्रदक्षिणा करतात. तिसऱ्या दिवशी देवी अग्नीत जाते आणि याच दुःखामुळे सर्व जोगती आपल्या हातातील बांगड्या फोडून अग्नीत टाकतात व नंतर यात्रेची सांगता होते, अशी यात्रेत आलेल्या जोगतींचा समज आहे.

हेही वाचा- मार्डीच्या यमाई मंदिरातील दागिन्यांवर चोरांचा डल्ला; जाताना साडीने झाकले देवीचे मुख

Intro:mh_sol_02_jogtya_yatra_7201168

कासेगावात जोगत्याचा डंका,
कासेगांव येथील यल्लमादेवी यात्रा, ५ हजार जोगती दाखल

सोलापूर-

महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतर राज्यातील जग जोगत्यांचे आणि भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील कासेगावच्या यल्लमा देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली असून, हजारो संख्येने सहभागी होणारे जोगती हे यात्रेचे वैशिष्टय आहे.Body:यल्लमा देवीची कर्नाटक मधील सौदंती, कोकटनूर, जत या ठिकाणी देवस्थाने आहेत.

पंढरपूर तालुकयातील कासेगावच्या यात्रेला जवळपास १०० वर्षांची मोठी परंपरा आहे. या यात्रेचा मान कासेगावच्या देशमुख घराण्याला आहे. देशमुख यांच्या पूर्वजणं दृष्टांत झाल्याने यल्लमा देवीचे कासेगावात मंदिर बाधंण्यात आले. तेव्हा पासून यात्रेला सुरुवात झाली आहे

महाराष्ट्रातून येणारे जग आणि जोगती हे कासेगावच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, पंजाब आदी राज्यातून जवळपास १०-२० हजार पेक्षा अधिक जोगती यात्रेच्या निमित्ताने कासेगावात हजेरी लावतात. तसेच परंपरागत चालत आलेल्या आपल्या जागेवरच अनेक वर्षनुवर्षं जोगत्यांचे जग शिस्तीमध्ये विसावतात. यात्रेच्या काळात देशमुख आणि देशपांडे यांच्या घरी देवी माहेरपणाला येते या ठिकाणी सर्वांचा मानपान होतो. यांनतर सर्व जग आणि जोगती यल्लमा देवीच्या पालखीच्या मागे गाव प्रदक्षिणा करतात.

यात्रेत आलेले सर्व जोगती यांचा समज आहे कि तिसऱ्या दिवशी देवी अग्नीत जाते आणि याच दुःखा मुळे सर्व जोगती आपल्या हातातील बांगड्या फोडून अग्नीत टाकतात. यानंतर यात्रेची सांगता होते .
.................

बाईट- विजयसिंह देशमुख( देवीचे मानकरी)

बाईट- मंजीरी देशमुख ( जोगती, पंजाब)

बाईट- सागर भालेराव ( जोगती, सोलापूर)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.