पंढरपूर ( सोलापूर ) : पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कॅनॉलमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन भीषण अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत ( MP labors death in solapur ) आहे. करकंब येथील देशमुख वस्ती जवळील उजनीच्या 33 नंबर फाट्यामध्ये ट्रॅक्टर जाऊन पलटी झाला. ट्रॅक्टर ट्रॉली तर पूर्ण उलटी झाली होऊन त्यातील काही जण त्याखाली अडकले होते.
अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी ( ४ dead in Solapur accident ) झाले आहेत. मृतांमध्ये अरविंद राजाराम कवछे ( 2वर्षे ) प्रिया नवलसिंग आय (2वर्ष) 3, सुरीका विरसिंग डावर (16 वर्ष )रनकबाई नवलसिंग आर्या (23 वर्षे ) यांचा समावेश आहे. जखमीमध्ये ईताबाई विरसिंग डावर (55 वर्ष) ,राजाराम देवसिंग कवछे (23 वर्षे), रिंकु सुमरिया कवछे (16 वर्ष),सुनिता राजाराम कवछे (वय 23) यांचा समावेश आहे. हे सर्व मध्य प्रदेश मधील बडवणी जिल्ह्यातील रा. कोलकी, ता. वरला.येथील मूळ रहिवासी आहेत. हे सर्व ऊस तोडणी कामगार मदने वस्ती करकंब येथे राहत होते.
या अपघातातील जखमींवरती करकंब ग्रामीण रुग्णालय व सोलापूर येथील शासकीय रुग्णालय मध्ये उपचार सुरू आहेत. घटना घडल्यानंतर ग्रामीण घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. करकंब पोलिसात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.