ETV Bharat / state

पंढरपूर पोटनिवडणूकीत 30 उमेदवारी अर्ज वैध; तर आठ अर्ज अवैध - पंढरपूर पोटनिवडणूक

30 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीत शितल शिवाजी आसबे, सिध्दाराम सोमाण्णा काकणकी यांचे वय कमी असल्याने अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे. बळीराम जालिंदर बनसोडे, किशोर सिताराम जाधव , सुधाकर रामदास बंदपट्टे यांनी अनामत रक्कम कमी भरल्याने व गणेश शिवाजी लोखंडे यांनी अनामत रक्कम न भरल्यामुळे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल
उमेदवारी अर्ज दाखल
author img

By

Published : Mar 31, 2021, 11:03 PM IST

पंढरपूर - पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी झाली. यामध्ये 38 उमेदवारंपैकी आठ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.

आठ उमेदवारांचा अर्ज अवैध
पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 38 उमेदवारांनी 44 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी 30 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीत शितल शिवाजी आसबे, सिध्दाराम सोमाण्णा काकणकी यांचे वय कमी असल्याने अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे. बळीराम जालिंदर बनसोडे, किशोर सिताराम जाधव , सुधाकर रामदास बंदपट्टे यांनी अनामत रक्कम कमी भरल्याने व गणेश शिवाजी लोखंडे यांनी अनामत रक्कम न भरल्यामुळे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे. मतदार संघाबाहेरील सूचक असल्याने सतिश विठ्ठल जगताप यांचा अर्ज अवैध ठरला आहे. तसेच पोपट हरी धुमाळ या उमेदवाराचा अर्ज मान्यता प्राप्त पक्ष नसल्याने व एकच सूचक दिल्याने उमेदवारी अर्ज अवैध ठरवला आहे.

30 उमेदवारांचा अर्ज मंजूर
पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी भगिरथ भारत भालके (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), समाधान महादेव आवताडे (भारतीय जनता पार्टी), शैला धनंजय गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन अरुण शिंदे (स्वाभिमानी पक्ष), संजय नागनाथ माने (महाराष्ट्र विकास आघाडी), महेंद्र काशिनाथ जाधव (पिपल्स रिपब्लिकन पार्टी), राजाराम कोडींबा भोसले (बळीराजा पार्टी), सिध्देश्वर भारत आवारे (बहुजन महापार्टी) बिराप्पा मधुकर मोटे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून संतोष महादेव माने, संदीप जनार्दन खरात, नागेश प्रकाश पवार, नागेश आण्णासो भोसले, इलियास हाजीयुसूफ शेख, रज्जाक उर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी, संजय चरणू पाटील, अशोक ज्ञानदेव वाघमोडे,अभिजीत वामनराव आवाडे-बिचकुले, अमोल अभिमन्यू माने, सुनिल सुरेश गोरे, सिताराम मारुती सोनवले, सिध्देश्वर बबन आवताडे, मोहन नागनाथ हळणवर, रामचंद्र नागनाथ सलगर, सुदर्शन रायचंद खंदारे, कपिलदेव शंकर कोळी, सुदर्शन पांडूरंग मसुरे,मनोज गोविंदराव पुजारी, बापू दादा मेटकरी, बिरुदेव सुखदेव पापरे या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी यावेळी दिली आहे.

ही आहे अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
यावेळी भगिरथ भारत भालके व समाधान महादेव आवताडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी आक्षेप फेटाळत अर्ज वैध ठरवले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2021 पर्यंत असल्याचेही गुरव यांनी यावेळी सांगितले आहे.

हेही वाचा-रेड्डीवर अबेडमेन्टचा गुन्हा दाखल झाल्यास सत्य बाहेर येईल - प्रकाश आंबेडकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.