सोलापूर - शहरात कोरोनाबाधितांची संख्या 102 झाली आहे. गुरुवारी कोरोनाबाधितांचा आकडा 21 ने वाढला तर तिघांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आली असल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
गुरूवारी कोरोनाबाधितांची संख्या 21 ने वाढली आहे. कालपर्यंत 81 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये आज 21 ने वाढ झाली आहे. आजपर्यंत सोलापुरात एकूण 102 कोरोनाबाधित असून त्यातील 6 जणांचा आगोदरच मृत्यू झाला आहे. यातील तिघांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज कोरोनाबाधितांचा आकडा हा शंभरीवर गेला आहे. त्यामुळे सोलापुरातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. तसेच सोलापुरातील परिस्थिती लक्षात घेता आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल असेही संकेत पालकमंत्र्यांनी दिले आहेत.