ETV Bharat / state

उजनी जलाशयातून मच्छिमारांनी पकडली दोनशे किलोची मगर - Ujani Dam Solapur News

मगरीला भराव्यावरून पाण्यात जाता येत नसल्याने ती त्यात अडकली होती. सदर मच्छिमारांना मगर दिसताच त्यांनी आपल्या साथीदारांना ही माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी मिळून या मगरीला दोरीच्या व जाळीच्या सहायाने पकडले.

solapur
मगरीचे छायाचित्र
author img

By

Published : Dec 3, 2019, 11:36 AM IST

सोलापूर- उजनीच्या अथांग जलाशयात मच्छिमारांना मासे सापडत नसल्याने मच्छिमारी व्यवसाय संकटात आला आहे. त्यातच भिमानगर येथील उजनी धरणाजवळील भराव्यावर सोमवारी मच्छिमारांना चक्क मगर आढळून आली. जलाशयातील मगरीला पकडण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले असून तिला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र, मगर आढळल्याने मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मगरीबाबत माहिती देताना ग्रामस्थ

मगरीला भराव्यावरून पाण्यात जाता येत नसल्याने ती त्यात अडकली होती. मच्छिमारांना मगर दिसताच त्यांनी आपल्या साथीदारांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी मिळून मगरीला दोरीच्या व जाळीच्या सहायाने पकडले. त्यानंतर पकडलेल्या मगरीबाबत वन अधिकाऱ्यांना महिती देण्यात आली. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मगर आपल्या ताब्यात घेतली असल्याचे समजले आहे.

उजनी जलाशयात मगरीचे वास्तव्य आहे, अशा बातम्या येत होत्या. परंतु, त्यावर विश्वास बसत नव्हता. मात्र, सोमवारी प्रत्यक्षात मगर सापडल्याने मच्छीमारांच्या पाचावर धारण बसली आहे. दरम्यान, भोई समाजातील महादेव नगरे, मामू भोई, शांतीलाल नगरे, नितीन सल्ले, सुरज नगरे, अशोक पतुले, दशरथ पतुले, संदीप खानेवाले, रवींद्र नगरे, पिंटू सल्ले यांनी मगर पकडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

हेही वाचा- जागतिक दिव्यांग दिन - 2 फुटाच्या नयनाची परिस्थितीवर मात करत शिकण्याची जिद्द

Intro:Body:करमाळा - बापरे! उजनी जलाशयात पकडली दोनशे किलोची मगर

Anchor - उजनीच्या अथांग जलाशयाच्या पाण्यामध्ये सध्या मच्छिमारांना मासे सापडत नसताना मच्छिमारी व्यवसाय संकटात आला आहे. त्यातच भिमानगर येथील उजनी धरणाजवळ भराव्यावर चक्क मगर असल्याची जलाशयात मच्छिमारी करणारे भगवान भोई मामू खानेवाले यांच्या यांच्यासह इतर मच्छीमारांना दिसली.तब्बल 12 फूट लांब व 200 किलो वजनाची मगर पकडण्यात स्थानिक मच्छिमार यांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिली आहे.

Vo - भराव्यावरून तिला पाण्यात जाता येत नसल्याने तिथे अडकली होती, सदर मच्छिमारांना मगर दिसताच त्यांनी आपल्या साथीदारांना ही माहिती दिली. ही माहिती देताच सर्वांनी मिळून या मगरीला दोरीच्या व जाळीच्या सहाय्याने पकडली व याची माहिती व अधिकाऱ्यांना दिली. वनाधिकार्‍यांनी येऊन सदर मगर आपल्या ताब्यात घेतली व पुढे नेली असे समजते.
उजनी जलाशयात मगरीचे वास्तव्य आहे, अशा बातम्या येत होत्या. परंतु त्यावर विश्वास बसत नव्हता. परंतु आज प्रत्यक्षातच मगर सापडल्याने उजनी जलाशयात मगरीचे वास्तव्य आहे. हे लक्षात आल्याने मच्छीमारांची पाचावर धारण बसली असून उजनी जलाशयात आणखी किती मगरी असतील अशी भीती मच्छिमारात निर्माण झाली आहे. त्यामुळे मच्छिमारास भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.भिमानगर येथे उजनी धरणावर
भोई समाजातील महादेव नगरे,
मामू भोई, शांतीलाल नगरे, नितीन सल्ले, सुरज नगरे, अशोक पतुले, दशरथ पतुले, संदीप खानेवाले, रवींद्र नगरे, पिंटू सल्ले यांनी मगर पकडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

बाईट - 1 - राजाराम माने ( ग्रामस्थ )

बाईट - 2 - ग्रामस्थ

बाईट - 3 - ग्रामस्थ

करमाळा प्रतिनिधी शितलकुमार मोटेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.