ETV Bharat / state

करमाळा वाढदिवस प्रकरण; २३ पैकी १६ अटक व सुटका, एका पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन

फिसरे येथील विकास ननवरे यांचा २४ तारखेला रात्री पावणे दहाच्या सुमारास वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी हातात तलवार व संचारबंदीत जमाव गोळा करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यात सोलापूरहून करमाळा येथे संचारबंदीदरम्यान बंदोबस्तासाठी आलेले पोलीस अधिकारी काळे हे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी फिसरे येथे आले होते. ते ननवरे यांच्या वाढदिवसामध्ये सहभागी झाले होते. याप्रकरणी त्यांंना निलंबित करण्यात आले आहे.

vikas nannavre birthday karmala
वाढदिवसाचे दृश्य
author img

By

Published : Apr 30, 2020, 11:18 AM IST

सोलापूर- संचारबंदी काळात करमाळा तालुक्यातील फिसरे परिसरात जमाव गोळा करून वाढदिवस साजरा करण्यात आला होता. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली होती. वाढदिवसात सहभाग असलेल्या २४ जाणांपैकी १६ जाणांना करमाळा पोलिसांनी अटक केली असून त्यांना तहसिलदारासमोर उभे करून शपथपत्रावर सोडण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात सहभागी झाल्याबद्दल सोलापूर ग्रामीण पोलिसातील अधिकारी विनायक काळे यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबन केले आहे. त्यामुळे, वाढदिवस साजार करणाऱ्यांएवजी पोलीस अधिकाऱ्यालाच हे प्रकरण भोवले आहे.

vikas nannavre birthday karmala
वाढदिवसाचे दृश्य

फिसरे येथील विकास ननवरे यांचा २४ तारखेला रात्री पावणे दहाच्या सुमारास वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी हातात तलवार व संचारबंदीत जमाव गोळा करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यात सोलापूरहून करमाळा येथे संचारबंदीदरम्यान बंदोबस्तासाठी आलेले पोलीस अधिकारी काळे हे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी फिसरे येथे आले होते. ते ननवरे यांच्या वाढदिवसामध्ये सहभागी झाले होते. या वेळी तलवारीने केकही कापण्यात आले होते. या प्रकाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

या प्रकरणावर पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी फोटोवरूनच पोलीस अधिकाऱ्यासह २३ तरुणांवर गुन्हा दाखल केला होता. तर मंगळवारी सदर प्रकरणातील संशयित करमाळा पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर त्यांना बॉन्ड घेऊन सोडण्यात आले आहे. पण, यासर्व प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याचे मोठे नुकसान झाले, त्याला निलंबित व्हावे लागले. या प्रकरणी इतर संशयित आरोपींचा पोलीस तपास करीत आहे. तपास पोलीस निरीक्षक गणेश शिंदे करीत आहेत.

हेही वाचा- पोलिसांच्या नियोजनामुळे मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळत भाजीपाल्याची खरेदी विक्री सुरु

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.