पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हाताचा जादा दराने विक्री करणाऱ्या 12 कृषी केंद्रांचे परवाने जिल्हा कृषी विभागाकडून रद्द करण्यात आली आहे. खतांची जास्त दराने विक्री करणे, खतांचा साठा पॉस मशिनवर न ठेवणे आदी कारणास्तव ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील 12 कृषी सेवा केंद्रांचे परवाने जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
जादा दराने खताची विक्री करणार्यांवर कारवाई -
राज्य सरकारने शेती संदर्भात कडक पावले उचलली आहेत. पावसाळा जवळ येत असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाची तयारी करत आहे. जिल्ह्यातील 3 लाख 75 हजार हेक्टरवर पोहोचले आहे. यामध्ये तुर, सोयाबीन, उडीद, मुग, मका, बाजरी या पिकांबरोबर उसाचे क्षेत्र ही मोठे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी वाढत आहे. राज्य सरकारी खतांचा काळाबाजार होऊ नये, म्हणून कृषी विभागाच्या वतीने पथके तयार करण्यात आली आहेत. जे कृषी केंद्र जादा दराने खत त्यांची विक्री करतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती, जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी दिली.
हेही वाचा - २ लाख नगद, ५० हजारांचे दागिने घेऊन नववधुचा पोबारा, यापूर्वीही एकाला फसवले होते
या 12 कृषी केंद्रांवर कारवाई -
मल्लिकार्जुन खत विक्री केंद्र, पद्मावती अॅग्रो एजन्सी, राजेश्वरी कृषी भंडार, शहा कृषी भांडार, गजानन कृषी केंद्र, गणेश कृषी केंद्र, लक्ष्मी कृषी केंद्र, न्यू उत्कर्ष कृषी भांडार, माळसिध्द कृषी सेवा केंद्र, राहुल कृषी केंद्र, झुआरी फार्म हब, फताटे उद्योग केंद्र बारा कृषी अशी परवाने रद्द केलेल्या केंद्राची नावे आहेत.
हेही वाचा - अंगावरील कपडे काढताच रुग्णालयाने परत केले पैसे; नाशिकातील घटना