ETV Bharat / state

जागतिक सायकल दिन विशेष - प्रणालीचा सायकलने ८५०० किलोमीटरच्या प्रवास

आपल्या स्वखर्चाने घेतलेल्या सायकलसोबत संपूर्ण महाराष्ट्र फिरायचं, तिथल्या लोकांना वाढत्या प्रदूषणाच्या समस्यांबाबत, निसर्गाच्या संगोपनाबाबत जागृत करायचं, वेगवेगळ्या भागातल्या निसर्गाचा आणि माणसांचा अभ्यास करायचा, स्थानिक पर्यावरणाविषयी जाणून घ्यायचं असं ठरवून प्रणालीने हा सायकल प्रवास सुरु केला. ती हा महाराष्ट्र दौरा एकट्यानं करतेय. तिचा हा प्रवास स्वतःच्या जबाबदारीवर सुरु आहे.

World Cycle Day Special - pranali arrive at Sindhudurg
जागतिक सायकल दिन विशेष
author img

By

Published : Jun 3, 2021, 7:46 AM IST

Updated : Jun 3, 2021, 9:03 AM IST

सिंधुदुर्ग - आपले इवलुसे पंख पसरून राज्यातील सर्व जिल्हे आपल्या कवेत घेण्यासाठी निघालेली एक निसर्गकन्या म्हणजेच प्रणाली चिकटे. पुनवट, यवतमाळ येथून गेल्या सात महिन्यात एकोणीस जिल्ह्यांचा प्रवास करत ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन पोहोचलीय. या साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास करत ती येथे पोहोचली आहे. आजच्या जागतिक सायकल दिनानिमित्त जाणून घेऊया तिची मनसोक्त सायकल भ्रमंती.

प्रणालीचा सायकलने ८५०० किलोमीटरच्या प्रवास

प्रणाली एकटीने करतेय महाराष्ट्र दौरा -

प्रणाली ही शिक्षणसमाजसेवा विषयात पदवीधर आहे. पर्यावरणाचा, निसर्गाचा जवळून अभ्यास करण्याची तिला आवड आहे. निसर्ग खूप बदलत आहे, तापमान वाढ, ऋतुचक्रात होणारा बदल, सभोवतालचे वाढते प्रदूषण यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याचा आणि शेतीच्या समस्या खुप वाढत आहेत. यावर आपण काही करू शकतो का ! असा विचार तिच्या मनात आला आणि सुरु झाला एक ध्येयवेडा प्रवास. आपल्या स्वखर्चाने घेतलेल्या सायकलसोबत संपूर्ण महाराष्ट्र फिरायचं, तिथल्या लोकांना वाढत्या प्रदूषणाच्या समस्यांबाबत, निसर्गाच्या संगोपनाबाबत जागृत करायचं, वेगवेगळ्या भागातल्या निसर्गाचा आणि माणसांचा अभ्यास करायचा, स्थानिक पर्यावरणाविषयी जाणून घ्यायचं असं ठरवून तिने हा सायकल प्रवास सुरु केला. ती हा महाराष्ट्र दौरा एकट्यानं करतेय. तिचा हा प्रवास स्वतःच्या जबाबदारीवर सुरु आहे.

अडथळा मार्ग रोखू शकत नाही -

या प्रवासात ती जिथे जाईल, तिथले लोकच तिला मदत करतात. राहण्या-खाण्याच्या सोईसोबत काहीजण आर्थिक मदतही करतात. एक मुलगी असून तिने शारीरिक, सामाजिक समस्यांची पर्वा न करता सुरु केलेला हा प्रवास अनेकांना स्फुर्तीदायक असाच आहे. तिच्या प्रवासाच्या मुक्कामात ती महिला सक्षमीकरणावर विशेष भर देते. आपली इच्छाशक्ती जर दांडगी असेल, तर कोणताच अडथळा आपला मार्ग रोखू शकत नाही. याचे प्रणाली हे एक उत्तम उदाहरण असेच म्हणावे लागेल.

कुटुंबाच्या पाठींब्यामुळे इथपर्यंतचा प्रवास -

२० ऑक्टोबर, २०२१ रोजी यवतमाळ मधील पुनवट या गावापासून सुरु झालेला तिचा प्रवास आता ९००० किलोमीटर पर्यंत जावून पोहोचलाय. या प्रवासात तिने २० जिल्हे आपल्या सायकलने पार केलेत. ती दि. १ जून रोजी ती कणकवलीत दाखल झाली. ३ जून रोजी ती कोल्हापूर प. महाराष्ट्र आणि पुढे मराठवाडा प्रवास करणार आहे. या प्रवासात तिने अनेक ठिकाणे बघितली आहेत. अनेक माणसे अगदी जवळून पाहिली. तिथले काही चांगले घेत आणि आपल्यातले काही चांगले देत तिचा प्रवास निरंतर चालू आहे. कोरोनाच्या या महाभयंकर काळातही तिची ही जिद्द कायम आहे. खरंतर कुटुंबाच्या पाठींब्यामुळेही ती इथपर्यंतचा प्रवास करू शकलीय. असे प्रणालीने यावेळी सांगितले.

प्रदूषण रोखण्यासाठी सायकल हा सर्वात चांगला पर्याय -

कोरोना काळात लॉकडाउनमुळे लोकांचा संचार कमी झाला. रस्त्यावर गाड्या कमी आल्या. उद्योगधंदे बंद राहिले परंतु यामुळेच पर्यावरणाची हानी कितीतरी कमी झाल्याचे तीने आवर्जून सांगितले. कोरोना मानवी जीवाला अपायकारक ठरला तरी पर्यावरणला मात्र पूरक ठरला आहे. असा तिचा विश्वास आहे. वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सायकल हा सर्वात चांगला पर्याय असल्याचे मत प्रणाली जागतिक सायकल दिनानिमित्त जनजागृती करताना व्यक्त करते आहे.

सिंधुदुर्गची निसर्गसंपदा सदा अबाधित राखली जावी -

याशिवाय इंधनाचे वाढते दर यामुळे सायकल खिशाला परवडणारी तसेच शरीर स्वास्था साठी उपयुक्त ठरत आहे, असे तिचे मत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनसंपदा भरपूर आहे. त्यामुळे हा भाग निसर्गरम्य वाटतो. मात्र ही निसर्गसंपदा सदा अबाधित राखली जावी यासाठी येथील युवा वर्गानेच विशेष काळजी घ्यायला हवी असे विचार प्रणालीने पुढील प्रवासासाठी निघताना व्यक्त केले.

हेही वाचा - विशेष बातमी : सायकलस्वारांची ज्येष्ठांना मदत,3858 किलोमीटर सायकल चालवत पोहोचवले औषधे आणि अन्न

Last Updated : Jun 3, 2021, 9:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.