कणकवली - सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासूनच मतदारांचा उत्साह पहायला मिळत आहे. नागरिकांनी मतदान करण्यासाठी जवळपास अर्धा तास आधीपासूनच मतदान केंद्रावर रांग लावायला सुरुवात केली. सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मतदारांमध्ये लगबघ वाढली आहे.
हेही वाचा - वांद्रे पूर्वेत मतदानाला सुरुवात; 11 वाजता ठाकरे कुटुंबीय करणार येथे मतदान
दरम्यान, रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले. मात्र, सकाळी पावसाने उसंत घेतल्याने मतदारांना मतदानासाठी दिलासा मिळाला आहे.