ETV Bharat / state

सिंधुदुर्गात जमिनीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी

author img

By

Published : Feb 18, 2021, 2:00 AM IST

फोंडाघाट बावीचे भाटले येथे दोन गटात जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. यादरम्यान ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. कणकवली पोलिसांत याप्रकरणी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

violent clashes between two families over land dispute in sindhudurg
सिंधुदुर्गात जमिनीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी

सिंधुदुर्ग - कणकवली तालुक्यात फोंडाघाट बावीचे भाटले येथे दोन गटात जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. यादरम्यान, दोन्ही गटातील ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्नालयात उपचार सुरु आहेत. कणकवली पोलिसांत याप्रकरणी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जमिनीच्या वादातून हाणामारी होण्याची गेल्या १५ दिवसांतली ही दुसरी घटना आहे.

जखमींना उपचारासाठी केले दाखल

पारकर व कातरुड कुटुंबात जमिनीवरून वाद -

फोंडाघाट बावीचे भाटले येथे पारकर व कातरुड या दोन कुटुंबात जमिनीवरून वाद आहेत. या वादामुळे सायंकाळी पारकर यांच्या कुटुंबातील लोकांनी कातरुड हे राहत असलेल्या घरी जात वाद केला. त्यात दोन्ही कुटुंबात लाकडी दांडा व अन्य साहित्याच्या सहायाने तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही कुटुंबातील ७ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती कणकवली पोलिसांनी दिली आहे.

जखमींना उपचारासाठी केले दाखल -

गंभीर जखमींमध्ये गणेश मधुकर पारकर (४७), ताराचंद्र मोहन पारकर (४९), तसेच एकनाथ धोंडू कातरुड व त्याची पत्नी शुभांगी एकनाथ कातरुड व मुलगा प्रशांत एकनाथ कातरुड हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी कणकवली पोलिसांनी दोन्ही कुटुंबातीळ जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्नालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

१५ दिवसांतली दुसरी घटना -

कणकवली तालुक्यात गेल्या १५ दिवसांत जमिनीच्या वादातून हाणामारीची ही दुसरी घटना आहे. १५ दिवसांपूर्वी कणकवली तालुक्यातील दिगवळे या गावी तेली आणि पवार कुटुंबात जमिनीच्या वादातून हाणामारी झाली होती. याही घटनेत दोन्ही बाजूचे ५ पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी होते. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच ही दुसरी घटना घडली आहे.

हेही वाचा - राज्यपालांकडे ती यादी कायद्याने गेली असती तर मंजूर झाली असती - विनोद तावडे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.