ETV Bharat / state

Narayan Rane on Malik Arrest : देशद्रोही मंत्र्याला कॅबिनेटमध्ये घेणाऱ्या सरकारनेच राजीनामा दिला पाहिजे - नारायण राणे

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik Arrest) यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपा करत आहे. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. देशद्रोही मंत्र्याला कॅबिनेटमध्ये घेणाऱ्या सरकारनेच राजीनामा दिला पाहिजे, असे नारायण राणे म्हणाले.

narayan rane
केंद्रीय मंत्री नारायण राणे
author img

By

Published : Feb 24, 2022, 6:37 PM IST

Updated : Mar 15, 2022, 5:05 PM IST

सिंधुदुर्ग - अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik Arrest) यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपा करत आहे. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. देशद्रोही मंत्र्याला कॅबिनेटमध्ये घेणाऱ्या सरकारनेच राजीनामा दिला पाहिजे. हिंदुत्ववादी विचाराच्या बाळासाहेबांचा पक्ष सत्तेसाठी लाचार झाला आहे. मलिक यांच्या समर्थनासाठी उपोषण करणाऱ्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक झाली पाहीजे, असे नारायण राणे म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे

नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी केली अटक -

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना सात तास चौकशी केल्यानंतर ईडीने बुधवारी अटक केली. मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची चर्चा सुरु होतीच. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे.

देशद्रोही मंत्र्याला कॅबिनेटमध्ये स्थान दिले -

यानंतर आज सिंधुदुर्गात बोलताना नारायण राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. देशद्रोही मंत्र्याला कॅबिनेटमध्ये स्थान दिले आणि त्याही राष्ट्रवादीच्या, आता त्याच्या समर्थनार्थ सर्वच जण बोलत आहेत. नवाब मलिक यांच्याबद्दल बोलायला कुणालाच अगदी मुख्यमंत्र्यांना देखील नैतिक अधिकार नाही. कडवट हिंदुत्ववादी बाळासाहेबांचा पक्ष आज लाचारीने वागतो आहे. पदासाठी देशद्रोही लोकांचा समर्थन करत आहे. यासारखी वाईट गोष्ट कोणती आणि समर्थनासाठी उपोषणाला देखील बसतात. या उपोषणाला बसणाऱ्या लोकांना देखील देशद्रोहाच्या कायद्याखाली अटक झाली पाहीजे, असेही यावेळी राणे म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे 18 खासदार -

राज्यात शिवसेनेचे फक्त 56 आमदार आहेत. 145 लागतात सत्ता स्थापन करण्यासाठी. सत्तेसाठी लाचारी पत्करून यांनी हिंदुत्वाचा त्याग केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले आहेत. पुढच्या वेळी पाच देखील येणार नाहीत, असेही राणे यावेळी म्हणाले.

Last Updated : Mar 15, 2022, 5:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.