ETV Bharat / state

सर्वसामान्य जनतेला १०० रुपयात दोन लिटर पेट्रोल; भाजप सदस्यांना एक लिटर मोफत पेट्रोल

author img

By

Published : Jun 20, 2021, 1:23 AM IST

Updated : Jun 20, 2021, 5:10 AM IST

आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथील पेट्रोल पंपावर सर्वसामान्य जनतेला १०० रुपयात दोन लिटर व भाजप सदस्य असलेल्याना कार्ड दाखवून एक लिटर अशा उपक्रमाची जाहिरातबाजी केली. शिवसेनेचा वर्धापनदिन होता, तर आजच्या आरोग्याच्या परिस्थितीत कितीतरी चांगले कार्यक्रम किंवा उपक्रम राबवता आले असते. जिल्हात कोरोना बळींची संख्या हजाराचा आकडा गाठत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला उकसावत वातावरण बिघडवण्याची काहीही गरज नव्हती.

भाजप सदस्यांना एक लिटर मोफत पेट्रोल
भाजप सदस्यांना एक लिटर मोफत पेट्रोल

सिंधुदुर्ग- आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथील पेट्रोल पंपावर सर्वसामान्य जनतेला १०० रुपयात दोन लिटर पेट्रोल व भाजप सदस्यांना एक लिटर मोफत पेट्रोल असा उपक्रम शनिवारी राबवला. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते त्याठिकाणी आल्यानंतर शिवसेना-भाजप कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. यावेळी आमदार वैभव नाईक हे पोलिसांना धक्काबुक्की करत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा भाजप आक्रमक बनली आहे. आमदार वैभव नाईक यांच्यावर ३५३ चा गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली

भाजपाला उकसावत वातावरण बिघडवण्याची काहीही गरज नव्हती
यावेळी बोलताना राजन तेली म्हणाले कि, शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथील पेट्रोल पंपावर सर्वसामान्य जनतेला १०० रुपयात दोन लिटर आणि भाजप सदस्य असलेल्याना कार्ड दाखवून एक लिटर अशा उपक्रमाची जाहिरातबाजी केली. शिवसेनेचा वर्धापनदिन होता, तर आजच्या आरोग्याच्या परिस्थितीत कितीतरी चांगले कार्यक्रम किंवा उपक्रम राबवता आले असते. जिल्हात कोरोना बळींची संख्या हजाराचा आकडा गाठत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला उकसावत वातावरण बिघडवण्याची काहीही गरज नव्हती. पण आमदार वैभव नाईक यांनी मुद्दाम राणे यांचा पेट्रोलपंप असलेल्या ठिकाणी येऊन वातावरण बिघडवले. याठिकाणी भाजप-शिवसेना वाद निर्माण केला आणि दुर्दैवी बाब म्हणजे हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना आमदार नाईक यांनी धक्काबुक्की केली. याचे व्हिडीओ उपलब्ध आहेत आणि काही वृत्तवाहिन्यानी ते बातमीसह प्रसिद्ध केले आहेत. असेही तेली म्हणाले.

पोलीस अधीक्षकांशी रस्त्यावर उतरून लढल्याचे महाराष्ट्राने पाहिले
याप्रकरणी आता सिंधुदुर्ग भाजप आक्रमक झाली असून जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेत या विषयावर चर्चा केली आहे. आमदार वैभव नाईक यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटमध्येही मी संघर्षासाठीच राणेंच्या पेट्रोल पंपावर घुसलो असल्याचे म्हणत घडल्या प्रकाराची कबुली दिली आहे. तसेच यापूर्वीही पोलीस अधीक्षकांशी रस्त्यावर उतरून लढल्याचे महाराष्ट्राने पाहिल्याचे सांगत जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान दिले आहे. या सगळ्याची सखोल चौकशी करून जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्याचे कटकारस्थान करणाऱ्या आणि पोलिस निरीक्षकांना धक्काबुक्की करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. असेही तेली यावेळी म्हणाले.

सत्तेच्या दबावाखाली न येता योग्य पद्धतीने कारवाई करा
आपण जाणीवपूर्वक संघर्ष करायला पेट्रोल पंपावर आल्याचे वैभव नाईक यांच्या प्रेसनोटवरून सिद्ध होत आहे, त्यामुळे या विषयात भाजपा कार्यकर्त्यांना दोषी मानून त्यांच्यावर गुन्हे दाखल करता येणार नाही. पोलिसांनी सत्तेच्या दबावाखाली न येता योग्य पद्धतीने कारवाई करून आमदार वैभव नाईक यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत आणि आपल्या दलातील दबावाखाली आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवावे अशी मागणी सिंधुदुर्ग भाजपाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांकडे केली असल्याचेही राजन तेली यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Jun 20, 2021, 5:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.