सिंधुदुर्ग - धरणात पोहताना दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिलिंद जाधव (वय - २७) आणि अमोल गौतम मळगावकर (वय - ३०) अशी मृतांची नावे आहेत. हे दोन्ही मित्र सावंतवाडी मळगाव आबेड़करनगर येथील रहिवासी होते.
वेंगुर्ला आडेली कामळेवीर येथीलपरिसरात दोघे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. मात्र, येथील धरणात पोहण्याच्या नादात या दोन्ही मित्रांचा मृत्यू झाला. सावंतवाडी मळगाव आबेड़करनगर येथील हे दोन्ही यूवक आहेत. मिलिंद जाधव (२७) अमोल गौतम मळगावकर (३०) अशी या युवकांची नावे आहेत. हे दोघेही बराच वेळ घरी न आल्यामुळे त्यांची शोधाशोध सुरु झाली. येथील धरण परिसरात दूचाकी, कपडे आणि इतर साहित्य लोकांना आढळून आले. मात्र, हे दोघेही बेपत्ता होते.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी 134 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर तिघांचा मृत्यू
घटनेची माहिती मिळताच, वेंगुर्ला आणि सावंतवाडी तहसिलदार तसेच पोलीस घट्नास्थळी दाखल झाले. शोधकार्य सुरु असताना दुपारनंतर दोघांचेही मृतदेह पाण्यात आढळून आले. या दोन युवकांपैकी अमोल गौतम मळगावकर याचा 24 जूनला वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते धरणावर गेले होते. यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.