ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मिटला; 13 लघु पाटबंधारे प्रकल्प भरले 100 टक्के - sindhudurg irrigation projects full

निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात 1 जूनपासूनच पाऊस दाखल झाला. सुरुवातीला वादळी पाऊस पडल्यानंतर जिल्ह्यात मोसमी पाऊस दाखल झाला. तेव्हापासून हा पाऊस अविरत कोसळत आहे. त्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील नदी, नाले, ओहोळ तुडूंब भरून वाहू लागले होते. पावसाने सातत्य राखल्याने जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला.

Thirteen small irrigation projects are 100 percent full in sindhudurg
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मिटला; 13 लघु पाटबंधारे प्रकल्प भरले 100 टक्के
author img

By

Published : Jul 10, 2020, 10:16 AM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आतापर्यंत 1600.825 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील 13 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तसेच देवगड तालुक्‍यातील कोर्ले-सातांडी हा मध्यम प्रकल्पही 100 टक्के भरला आहे. तर जिल्ह्यातील एकमेव असलेल्या तिलारी आंतरराज्य या मोठ्या प्रकल्पात 69.34 टक्के पाणीसाठा भरला आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात 1 जूनपासूनच पाऊस दाखल झाला. सुरुवातीला वादळी पाऊस पडल्यानंतर जिल्ह्यात मोसमी पाऊस दाखल झाला. तेव्हापासून हा पाऊस अविरत कोसळत आहे. त्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील नदी, नाले, ओहोळ तुडूंब भरुन वाहू लागले होते. पावसाने सातत्य राखल्याने जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला.

हेही वाचा - पुणे : ठेकेदाराने पगार न दिल्याने सुपरवायझरची गळफास घेत आत्महत्या

जुलै महिना सुरू होऊन सात दिवस झाले आहेत. तरी पाऊस सातत्याने कोसळत असल्याने या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. सततच्या पावसामुळे देवगड तालुक्‍यातील कोर्ले-सातांडी मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला आहे. सध्या या प्रकल्पातून 3 घनमीटर सेकंद विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेल्या तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये सध्या 310.2090 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. सध्या हा प्रकल्प 69.34 टक्के भरला आहे. तर देवघर मध्यम प्रकल्पामध्ये 49.6140 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 50.62 टक्के आणि अरुणा प्रकल्पामध्ये 31.8800 म्हणजेच 45.33 टक्के पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यातील लघु पाटबंधारे असलेले शिवडाव, आडेली, आंबोली, हातेरी, माडखोल, निळेली, सनमटेंब, पावशी, शिरवल, पुळास, हरकुळ, ओझरम, लोरे हे 13 प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. हरकुळ प्रकल्पातून सध्या 14.65 घनमीटर सेकंद इतका विसर्ग सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.