ETV Bharat / state

Hapus Mango : देवगड हापूसची पहिली पेटी मुंबई मार्केटला रवाना - Devgad taluka

देवगड तालुक्यातील ( Devgad hapoos ) कातवण येथील आंबा बागायतदार ( Hapus Mango ) दिनेश शिंदे, प्रशांत शिंदे यांनी नैसर्गिक पद्धतीने हापूसचे पीक ( Hapus Mango Crop ) घेतले आहे. त्यांनी पहिली दोन डझन हापूस आंब्याची पेटी मुंबईतील वाशी मार्केटला ( Hapus Mango Vashi Market in Mumbai ) पाठवली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 24, 2022, 9:40 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ( Devgad hapoos ) कातवण येथील आंबा बागायतदार ( Hapus Mango ) दिनेश दीपक शिंदे, प्रशांत सिताराम शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आपल्या बागेतील हापूसचे पीक नैसर्गिक पद्धतीने ( Hapus Mango Crop ) घेतले आहे. त्यांनी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचा मुहूर्त साधून आंबा काढण्याचा शुभारंभ केला आहे. त्यांनी पहिली दोन डझन हापूस आंब्याची पेटी मुंबईतील वाशी मार्केटला पाठवली आहे.

हापूस आंब्याची पेटी मुंबईतील वाशी मार्केटला रवाना - कातवण येतील आंबा बागायतदार प्रशांत शिंदे, दिनेश शिंदे यांच्या बागेत हापूसच्या कलमांना 15 ऑगस्ट पासूनच मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, काही कलमावरील आलेला मोहर गळून पडला होता. चार ते पाच कलमावरील मोहरा तसाच टिकून होता. त्यामुळेच या चार कलमांवरती मिळालेल्या आंब्याचे पहिले फळ काढत देवगड हापूसची पहिली पेटी आज वाशी येथे जाण्यासाठी रवाना झाली.

Hapus Mango
देवगड हापूसची पहिली पेटी मुंबई मार्केटला रवाना

आंब्याचा मोहर टिकण्यात यशस्वी - या दोन डझनच्या आंबा पेटीला साधारणतः सात ते आठ हजारच्या आसपास भाव मिळेल असा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. मात्र यावर्षी आंबा हंगाम पाहता अजूनही हापूसच्या कलमांना पालवीच येत आहे. मात्र, अशावेळी हापूसच्या कलमांची योग्य निगा राखत पहिली पेटी या दोन युवा आंबाबागायदारांनी पाठविली आहे. ऋतुचक्रात वारंवार बदल असून देखील या दोन बंधूनी मोहोर टिकविण्यासाठी अथक प्रयत्न केले.

नैसर्गिक पद्धतीने पिकविला हापूस - या वेळी आलेल्या आंबा पिकाची चव देखील शेतकऱ्यांनी स्वतः चाखून पहिली. त्यांनंतरच उर्वरित आंबे काढत ही पेटी आज मार्गस्थ केली आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या मालाचा दर्जा चांगला आहे की नाही हे बागायतदाराने पाहणे खूप गरजेचे असते. या शुभारंभ प्रसंगी आंबा बागायतदार दीपकचंद्र शिंदे, दिनेश शिंदे, प्रशांत शिंदे ,नरेश डामरी, पप्पू लाड आदी उपस्थित होते

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.