ETV Bharat / state

प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेला सुरुवात, मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग प्रशासनाकडून सील - anganewadi bharadi devi yatra

जिल्हा प्रशासन आणि आंगणे कुटुंबियांनी भाविकांसाठी आंगणेवाडीत प्रवेश बंदी केली असून आंगणेवाडीत येणारे सर्व रस्ते पोलिसांनी सील केले आहेत. मंदिर परिसरात दुकाने लावण्यास मनाई केली असून पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.

Breaking News
author img

By

Published : Mar 6, 2021, 11:53 AM IST

सिंधुदुर्ग : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने आणि केवळ आंगणे कुटुंबीय तसेच आंगणेवाडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियम व अटी पाळून केवळ आंगणे ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा यात्रोत्सव पार पडत आहे.

प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेला सुरुवात

भाविकांसाठी आंगणेवाडीत प्रवेश बंदी
जिल्हा प्रशासन आणि आंगणे कुटुंबियांनी भाविकांसाठी आंगणेवाडीत प्रवेश बंदी केली असून आंगणेवाडीत येणारे सर्व रस्ते पोलिसांनी सील केले आहेत. मंदिर परिसरात दुकाने लावण्यास मनाई केली असून पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रचंड गर्दी टाळून आंगणेवाडीची यात्रा संपन्न होत आहे.
प्रचंड गर्दी आणि दुकानांचा थाट नाही
आंगणेवाडी यात्रा उत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच पुणे-मुंबईहून येणाऱ्या भाविकांची गर्दी टाळण्यात आली आहे. आंगणेवाडी यात्रा म्हणजे कोकणातील व्यापाऱ्यांसाठी मोठ्या उलाढालीचे केंद्रस्थान असते. फिरत्या व्यापाऱ्यांसाठी यात्रा मोठे उत्पन्न देऊन जाते. या ठिकाणी मोठ्या संख्येने दुकाने मांडली जातात आणि कोट्यवधींची उलाढाल यामुळे होते. मात्र यावर्षी कोरोनामुळे यात्रेवर निर्बंध आल्याने व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.
एसटी महामंडळाचे मोठे नुकसान
एसटी महामंडळासाठीही ही यात्रा महत्वाची ठरते. सिंधुदुर्ग जिल्हा एसटी विभागाकडून वेगवेगळ्या बस स्थानकातून सुमारे 130 बसेस यात्रेसाठी सोडल्या जातात. यात्रा स्थळी एसटी स्थानक उभारले जाते. लाखो रुपयांचा नफा एसटीला या यात्रेतून होतो. यात्रेनंतर देवगड तालुक्यातील कुणकेश्वर यात्रा येते. याही यात्रेला विविध स्थानकांमधून एसटी बस सोडल्या जातात. या दोन यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी महामंडळाला मोठा नफा मिळवून देतात. मात्र कोरोनामुळे या दोन्ही यात्रांवर निर्बंध आल्याने एसटी महामंडळाचेही मोठे नुकसान झाले आहे.
राजकीय नेते मंडळींची असते कोकणवारी
या यात्रेच्या निमित्ताने राजकीय नेत्यांची कोकणवारी सुरू होते. विशेषत: राज्यातील शिवसेनेची नेते मंडळी यात्रेला आवर्जून हजेरी लावतात. मुंबईतील शिवसेनेचे नेते, मुंबईचे महापौर, मुंबईतील नगरसेवक यात्रेसाठी आवर्जून येतात. त्याशिवाय आमदार, खासदार, मंत्रीही या यात्रेला येत असतात. देव दर्शनासोबतच कोकणातील मोठ्या जनसमुदायाला आपल्याकडे वळविण्याची एक संधी प्रत्येक राजकीय पक्षाला या यात्रेनिमित्त मिळते. परंतु यावर्षी प्रशासनाने कोरोना प्रादुर्भावामुळे यात्रेवर निर्बंध घातल्याने राजकीय पक्षांच्या नेत्यांची कोकणवारी टळली आहे. दरम्यान यात्रा स्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात्रेच्या वेळी गजबजलेले रस्ते यावर्षी सुने-सुने दिसत आहेत.
आहात तिथूनच देवीची प्रार्थना करा
भाविकांनी जिथे आहे तिथूनच देवीची आराधना करा, यात्रेच्या ठिकाणी येण्याचे टाळा असे आवाहन आंगणेवाडी भराडी देवी मंदिर समितीचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केले आहे. कोरोनामुळे यावर्षी हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला आहे. तरी सर्व भाविकांनी आम्हाला सहकार्य करावे असे त्यांनी म्हटले आहे. कोरोनाचे सर्व नियम आणि अटी पाळून आमचे आंगणे कुटुंबीय देवीचे दर्शन घेत आहेत असेही त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.