सिंधुदुर्ग - जिल्ह्याच्या समुद्र किनारी आज जोरदार वादळी वारे वाहू लागले. यामुळे मच्छिमार बोटी मोठ्या प्रमाणात समुद्र किनाऱ्यावर दाखल झाल्या आहेत. त्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानेही मच्छिमार बांधवाना समुद्रात जाऊ नये, असे आवाहन केले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्र किनारी आज जोरदार वादळी वारे धडकू लागले. यामुळे मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटी बंदरात परतल्या आहेत. जिल्ह्याच्या मालवण, देवगड, वेंगुर्ले बंदरात आज बोटींची मोठी संख्या पहायला मिळत होती. अरबी समुद्रातील घडामोडींचा परिणाम म्हणजे आज जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. किनारी भागात मोठ्या प्रमाणावर जोरात वारे वाहत आहेत. यामुळे भीतीचे वातावरण आहे. दरम्यान वादळाच्या भीतीने मच्छिमार आपल्या बोटी घेऊन बंदरात परतल्याने बोटींची मोठी गर्दी पहायला मिळत होती.