ETV Bharat / state

उदय सामंतांच्या उपस्थितीत शिव भोजन थाळीला सुरुवात; उपोषणकर्त्यांची नाराजीही केली दूर

author img

By

Published : Jan 26, 2020, 8:35 PM IST

सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयातील जिल्हा विकास यंत्रणेच्या गाळ्यांमध्ये शिवभोजन थाळीचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला. शिवभोजन थाळी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाची फीत कापण्याचा मान पालकमंत्र्यांनी बचतगटाच्या एका महिलेला दिला. या शिव भोजन थाळीतील पदार्थांचा आस्वादही त्यांनी घेतला.

उदय सामंत
उदय सामंत

सिंधुदुर्ग - प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयामध्ये उपोषणाला बसलेल्या सर्व नागरिकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तरीही प्रश्न न सुटल्यास प्रत्यक्ष भेटून परिस्थिती सांगा, नक्की प्रश्न मार्गी लावू असे, आश्वासन पालकमंत्री सामंत यांनी उपोषणकर्त्या नागरिकांना दिले.

उदय सामंतांनी उपोषणकर्त्यांची नाराजी दूर केली

जिल्हा मुख्यालयातील जिल्हा विकास यंत्रणेच्या गाळ्यांमध्ये शिवभोजन थाळीचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला. शिवभोजन थाळी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाची फीत कापण्याचा मान पालकमंत्र्यांनी बचतगटाच्या एका महिलेला दिला. या शिव भोजन थाळीतील पदार्थांचा आस्वादही त्यांनी घेतला.

हेही वाचा - राजपथावरही 'ती'चा आवाज , कॅप्टन तानिया शेरगील यांनी केले प्रजासत्ताकदिन संचलनाचे नेतृत्व

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतून साकारलेल्या या योजनेचा शुभारंभ करताना विशेष आनंद होत आहे. गरीब आणि गरजू लोकांसाठी ही एक चांगली योजना आहे. या योजनेचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. भविष्यात राज्यातील प्रत्येक शहरात आणि गावामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. लोक कल्याणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमीच पुढे असतात. अशा लोक कल्याणकारी योजना मुख्यमंत्री राज्यात सुरू करतील, असे सामंत म्हणाले.

यावेळी पालकमंत्री सामंत यांच्यासोबत आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.

Intro:अँकर /- प्रजासत्ताक दिना निमित्त जिल्हा मुख्यालयामध्ये उपोषणास बसलेल्या सर्व नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. ध्वजारोहणाच्या शासकीय मुख्य कार्यक्रमानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी उपस्थित सर्व संबंधित अधिकारी यांना त्यांनी प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. तसेच प्रश्न न सुटल्यास प्रत्यक्ष भेटून परिस्थिती सांगा, आपण नक्की प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन पालकमंत्री श्री. सामंत यांनी उपोषणास बसलेल्या नागरिकांना दिल्या.
Body:V /O -   पालकमंत्री श्री. सामंत यांनी स्वतः आपुलकीने भेट घेऊन प्रत्येक उपोषण कर्त्यांचे म्हणणे ऐकूण घेत निवेदने स्विकारली. या मागण्यांवर ज्या ठिकाणी जिल्हास्तरावर मार्ग निघत आहे तिथे तातडीने संबंधितांचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या व ज्या मागण्यांबाबत राज्य पातळीवर निर्णय आवश्यक आहे व संबंधीत नागरिकांचे प्रश्न समजने गरजेचे आहे त्यांना आपण स्वतः लक्ष घालून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांच्या सोबत आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.
Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.