ETV Bharat / state

सिंधुदुर्ग: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ६० लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त - counterfeit liquor seized Sindhudurg

६० लाख १३ हजार २०० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू व ३० लाख किंमतीचा कंटेनर, असा एकूण ९० लाख १३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यामध्ये रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून, कंटेनर चालक व क्लीनर यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांनी दिली.

६० लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त
६० लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त
author img

By

Published : Oct 27, 2020, 8:06 PM IST

सिंधुदुर्ग- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या कंटेनरमधून ६० लाखांची दारू जप्त केली आहे. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांनी दिली.

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैद्य गोवा बनावटीची दारू वाहतूक विरोधात कारवाईची मोहीम आखण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आज मुंबई-गोवा महामार्गावरील ओरोस येथील राजधानी हॉटेल समोर पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी पोलिसांनी गोव्याहून-मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटनेरची (क्र. एमएच-१८ एए-८६७१) तपासणी केली. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गोवा बनावटीची दारू व बिअर असलेले एकूण १ हजार ५२ बॉक्स आढळले.

पोलिसांनी ६० लाख १३ हजार २०० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू व ३० लाख किंमतीचा कंटेनर, असा एकूण ९० लाख १३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यामध्ये रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून, कंटेनर चालक व क्लीनर यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांनी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, पोलीस अंमलदार रामचंद्र शेळके, सुधीर सावंत, प्रकाश कदम आदींनी केली.

हेही वाचा- 'उद्धव ठाकरेंनी बेडकांच्या नावाने उडवलेली टोपी नारायण राणेंनी स्वतःहून झेलली'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.