ETV Bharat / state

'कोरोना'चा कहर : सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा सतर्क - Sindhudurg latest news

खोकला, अंगदुखी, ताप अशी लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा रुग्णालयात उपचार घ्यावेत. तसचे रोगप्रतिकार शक्ती वाढल्यावर हा आजार बरा होतो. त्यामुळे घाबरून जाऊ नये, असे आवाहन डॉ. चाकुरकर यांनी केले आहे.

Sindhudurg health system
सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा सतर्क
author img

By

Published : Feb 8, 2020, 9:36 AM IST

सिंधुदुर्ग - सिंधुदुर्गातील वेंगुर्ले-रेडी बंदरात लोह-खनिज नेण्यासाठी चीन येथून 'नाथन ब्रॅन्डॉन' हे 55 हजार मेट्रीक टन क्षमतेचे सिंगापूरचे जहाज रेडी बंदरात दाखल झाले आहे. त्यामुळे चीनमध्ये उद्भवलेल्या कोरोना या विषाणूजन्य आजाराबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होवू नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.

नाथन ब्रॅन्डॉन जहाज
नाथन ब्रॅन्डॉन जहाज

चीनमध्ये थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा भारतात प्रसार होऊ नये, यासाठी चीनहून येणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी राज्यसभेत दिली. देशाबाहेरून आलेल्या १५० प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय आल्याने त्यांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने कोरोना रोखण्यासाठी उपाय कडक केले आहेत.

हेही वाचा - सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 'उत्कर्षा'ची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली दखल

त्यामुळे या आजाराने जनतेने घाबरून न जाता जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी केले आहे. सध्या तरी कोरोना विषाणूची लागण जिल्ह्यात झालेली नाही. परंतु, हा संसर्गजन्य आजार असल्याने अन्य राज्यात प्रवास करणाऱ्यांकडून हा आजार जिल्ह्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या आजारावर जिल्ह्यात जनजागृती व्हावी, यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणेने खबरदारीच्या उपाययोजना आखल्या आहेत. सर्दी, खोकला, श्वसनाचे आजार, प्रतिकारशक्ती कमी आदी लक्षणे दिसून आल्यास रुग्णांनी सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन चाकुरकर यांनी केले आहे.

हेही वाचा - सावंतवाडीत सीएएच्या समर्थनार्थ मोर्चा

Intro:अँकर/-कोरोना व्हायरसच्या पाश्वभुमीवर चीन मधून येणारी जहाजे, विमाने व प्रवाशांबाबत देशभरात अतिदक्षता घेतली जात असताना सिंधुदुर्गातील वेंगुर्ले-रेडी बंदरात लोह खनिज नेण्यासाठी चीन येथून 'नाथन ब्रॅन्डाॅन' हे 55 हजार मेट्रीक टन क्षमतेचे सिंगापूरचे महाकाय जहाज रेडी बंदरात दाखल झाले आहे. स्थानिक सीमाशुल्क विभागाला सदर जहाजावरून देण्यात आलेल्या माहीती नूसार त्या जहाजावर कॅप्टनसह 22 कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले.माञ कोरोना व्हायरस च्या पाश्वभुमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंञणा माञ अलर्ट झाली आहे.Body:V/O-या आजाराने जनतेने घाबरुन न जाता जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी केले आहे. करोना वायरस जिल्ह्यात नाही परंतु हा संसर्गजन्य आजार असल्याने अन्य राज्यात प्रवास करणाऱ्यां कडून हा आजार जिल्ह्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या आजारावर जिल्ह्यात जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा खबरदारीच्या उपाययोजना आखल्या आहेत. सर्दी, खोकला, श्वसनाचे आजार, प्रतिकारशक्ती कमी आदि लक्षणे दिसून आल्यास रुग्णांनी सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावेत. असे आवाहन डॉ धनंजय चाकुरकर यानी केले आहे.
ही …Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.