ETV Bharat / state

सुधारीत कृषी अवजारांशिवाय सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांना करावी लागणार शेती - improved agricultural instruments

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम सुरू झालेला असून, आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुधारित कृषी अवजारांचा वापर करणे गरजेचे आहे. मागील पाच वर्षात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळावे. यासाठी सुधारित कृषी अवजारे वितरणावर भर देण्यात आला होता.

Farmers
सुधारीत कृषी अवजारांशिवाय सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांना करावी लागणार शेती
author img

By

Published : Jun 17, 2020, 12:59 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या कृषी अवजारांसाठी अर्ज केले आहेत. मात्र, कृषी विभागाकडे आलेले 6 हजार 166 प्रस्ताव प्रलंबित आहेत. सध्या शेती हंगाम सुरू झाला आहे. परंतु सुधारित कृषी अवजारांशिवाय यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती करावी लागणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम सुरू झालेला असून, आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुधारित कृषी अवजारांचा वापर करणे गरजेचे आहे. मागील पाच वर्षात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळावे. यासाठी सुधारित कृषी अवजारे वितरणावर भर देण्यात आला होता. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या संख्येने प्रस्ताव मागविले होते. या योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे सुधारित कृषी अवजारे मिळण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रस्ताव तयार करण्यात आले होते.

सुधारित कृषी अवजारे मिळावीत यासाठी राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत तब्बल 6 हजार 166 शेतकऱ्यांनी अर्ज कृषी विभागाकडे केले आहेत. यामध्ये सावंतवाडी 1 हजार 295, कुडाळ 1 हजार 200, वेंगुर्ले 295, दोडामार्ग 236, कणकवली 1 हजार 300, मालवण 578, देवगड 1 हजार आणि वैभववाडी 262 अशाप्रकारे तालुकानिहाय प्रस्तावांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून सुधारित कृषी अवजारांची फार आवश्‍यकता आहे. मात्र, कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जिल्हा कृषी विभागाला लक्षांक व मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतीची अवजारे मिळण्यास फारच अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ही योजना रखडली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.