सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्हा बँक ( Sindhudurg District Bank Election ) निवडणुकीच्या एक दिवस आधी भाजप प्रणित पॅनलला मोठा धक्का बसला आहे. आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane ) यांचा जिल्हा बँक निवडणुकीतील मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे. आमदार राणे हे जिल्हा बँकेचे १६ कोटी रुपयांचे थकित कर्जदार असल्याने त्यांचा मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात चर्चेला उधान आले आहे. एका बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane ) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेत भाजपप्रणीत पॅनल लढत असताना दुसऱ्या बाजूला आमदार नितेश राणे हे थकित कर्जदार असल्याने त्यांचा मतदानाचा हक्क नाकारला गेला आहे. यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा : Police Notice To Narayan Rane : नारायण राणे हाजीर हो.. कणकवली पोलिसांनी चौकशीसाठी बजावली नोटीस
बँकेकडून घेतले होते १६ कोटी रुपये कर्ज
३० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक होत असून ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करू लागले आहेत. भाजपाने देखील या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केली आहे. परंतु या निवडणुकी आधीच भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आमदार नितेश राणे ज्या संस्थेचे सदस्य आहेत. त्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाने जिल्हा बँकेकडून कर्ज रुपी घेतलेले १६ कोटी रुपयांची परतफेड केली नसलयामुळे सहकार विभागाने आमदार राणेंचा मतदानाचा अधिकार नाकारला आहे. भाजपकडून जिल्हा बँकेसाठी उमेदवार म्हणून आमदार राणेंचे नाव चर्चेत होते. मात्र आमदार नितेश यांचा मतदानाचा हक्क नाकारला गेल्याने केंद्रीय मंत्री राणेंना व भाजपाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
हेही वाचा : Santosh Parab Attack Case : नितेश राणेंवर अटकेची तलवार कायम, कोर्ट आज देणार निकाल
स्वतःचे थकीत कर्ज बुडविण्यासाठी राणेंना जिल्हा बँक ताब्यात हवी
दरम्यान स्वतःच्या स्वार्थासाठी राणेंना जिल्हा बँकेचा कारभार हवा आहे. नारायण राणे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा माझ्यासह १३ कार्यकर्त्यांच्या नावावर त्यांनी बोलेरो गाड्या घेतल्या होत्या. त्या गाड्यांचे कर्ज आम्ही स्वतः फेडले आहे. त्या गाड्या आजही त्यांच्या ताब्यात आहेत. ७ गाड्यांचे प्रत्येकी १८ लाख कर्ज अजूनही थकीत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अण्णा केसरकर यांचेही १७ लाख रुपये थकीत आहेत. त्यांचेही पैसे अजून भरले गेले नाहीत. या बोलेरो गाड्यांचे १ कोटी ४० लाख रुपये थकीत आहेत आणि हे कर्ज बुडविण्यासाठीच त्यांना ही जिल्हा बँक ताब्यात हवी आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राणेंना बँक नकोय, असा आरोप महाविकास आघाडीचे जिल्हा बँक निवडणुक पॅनेल प्रमुख सतीश सावंत ( Satish Sawant ) यांनी केला आहे.