सिंधुदुर्ग - जिल्ह्यात कोरोना मृत्यूची आकडेवारी अजिबात लपविली जात नाही. तर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट हा साडेसात टक्यांवर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उद्योग व्यवसायात शिथिलता देण्यात आली तरी पर्यटन व्यवसायात अजिबात सूट नाही, असेही ते यावेळी म्हणाले. तर नितेश राणे यांनी कोरोना रुग्णांची आकडेवारी लपवण्यात येत असल्याचा आरोप सामंतावर केला होता. त्याला त्यांनी हे प्रतिउत्तर दिले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार एकही मृत्यू लपवला जात नाही -
जिल्ह्यात अजिबात मृत्यूची आकडेवारी लपविली जात नाही. असे सांगताना पालकमंत्री उदय सामंत यांनी बिहारचे उदाहरण दिले. ते म्हणाले, बिहार राज्याने तब्ब्ल ७८ हजार मृत्यू लपवले गेल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आपल्याकडे एकही मृत्यू लपवला जात नाही. आणि ते आकडे मागच्या दोन दिवशीचे राहिले असतील तर पुढच्या अहवालात त्याचा उल्लेख केला जातो. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सिंधुदुर्गात पर्यटन व्यवसायावर निर्बंध कायम -
सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यात शेवटच्या टप्यात रुग्णांची संख्या वाढत गेली. मात्र आता आपण साडेसात टक्यांवर आलो असून तिसऱ्या टप्यात आलो आहोत. यामुळे अनेक गोष्टीत आपण शिथिलताही दिलेली आहे. तर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात यश आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान पर्यटन व्यवसायाला अद्यापही परवानगी नाही. कारण यामुळे पुन्हा लोक एकत्र येतील आणि समूह संसर्ग वाढू शकतो यामुळे राज्यात लागू असलेल्या डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पर्यटन व्यवसायावर निर्बंध असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्गातील तीन वर्षांतील मृत्यूंचा अहवाल लवकरच तयार -
मागच्या तीन वर्षात जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण कसे होते याचा अहवाल तयार करण्याचा आपण आणि खासदार विनायक राऊत यांनी निर्णय घेतला असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात कोविड चालू झाला त्यावर्षीचे मृत्यू किती आहेत. त्याच्या अगोदरच्या वर्षी नॉन कोविड मधले मृत्यू किती आहेत. आणि यावर्षीच्या मृत्यू किती आहेत. या सगळ्याचा अहवाल तयार केला जात आहे. यामध्ये शासकीय आणि खासगी रुग्नालयातील मृत्यूचा आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - 'डेल्टा प्लस रुग्णाबाबत पालकमंत्री उदय सामंत माहिती लपवत आहेत'