ETV Bharat / state

शेती नुकसानीचे पंचनामे करा; कुचराई केल्यास कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तंबी - नुकसानीचे पंचनामे आदेश

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कामात कुचराई केल्यास कारवाई करणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

panchnama is carried out
शेती नुकसानीचे पंचनामे करा
author img

By

Published : Oct 23, 2020, 7:30 AM IST

सिंधुदुर्ग - अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी विभागाने दिलेल्या प्राथमिक अंदाजापेक्षा हे नुकसान जास्त आहे. शेतीचे नुकसान नेमके किती झाले आहे हे समजण्यासाठी नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. या कामी कोणत्याही अधिकाऱ्याने कुचराई केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट शब्दात जिल्हाधिकारी यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे.

यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासह माजी आमदार व सदस्य ॲड. अजित गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हेत्रे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांच्यासह विभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संबंधित सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे सुरू आहेत. ते तातडीने पूर्ण करावेत असे सांगून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या की, कृषी क्षेत्राचे झालेले नेमके नुकसान लवकरात लवकर समजण्यासाठी हे पंचनामे तातडीने पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे युद्धपातळीवर पंचनामे करा, असे आदेश देण्यात आले आहेत. कृषी विभागाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतन बैठक सभागृहात झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी हे आदेश दिले.

आदर्श ग्राम योजनेसाठी दोडामार्ग तालुक्यातील केर या गावाचा दोन कोटी १० लाख रुपयांचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमाविषयीची प्रकरणे विमा कंपनीकडे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. त्याचा पाठपुरावा कंपनीकडे करावा अशा सूचनाही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या. यावेळी एकात्मिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कार्यक्रम, आत्मा तसेच कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच आवश्यक सूचना केल्या.

पंचनाम्यात कुचराई केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत

तालुका कृषी अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून हे पंचनामे पूर्ण करावेत. पंचनामे पूर्ण करण्यात काही अडचणी असल्यास त्या कृषी अधीक्षक, प्रांताधिकारी किंवा तहसीलदार यांना कळवाव्यात. या कामी कोणत्याही अधिकाऱ्याने कुचराई केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी ॲड. अजित गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.