सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून एक मार्चपासून विमान वाहतूक सूरू करणार, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. कालपासून ट्रायल रन सूरू झाली असून नियमित सेवा आता सुरू होईल, असेही ते म्हणाले. सिंधुदुर्गात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काही दिवसात डीजीसीएची टीम येईल
चिपी विमानतळावरून एक मार्चपासून विमान वाहतूक सूरू करण्यात येणार आहे. त्यासाठी कालपासून ट्रायल रन सूरू झाली असून लवकरच नियमित सेवाही सुरू होईल. काही दिवसात डीजीसीएची टीम देखील येईल. एक मार्चपासून नियमितपणे सिंधुदुर्ग ते मुंबई आणि अहमदाबाद ते सिंधुदुर्ग अशी विमान वाहतूक सूरू करणार असल्याचे खासदार विनायक राऊत म्हणाले.
नारायण राणेंच्या कारकिर्दीत फक्त 14 टक्के काम झालं
चिपी विमानतळाचे अपूर्ण काम आम्ही पुर्ण केले. नारायण राणे यांच्या कारकिर्दीत फक्त 14 टक्के काम झाले. मात्र आम्ही शंभर टक्के काम पुर्ण करून विमान वाहतूक सूरू करणार, असल्याचे देखील खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. 1 मार्चला प्रत्यक्षात वाहतूक सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्हावासियांचे स्वप्न साकार होणार आहे, असेही खासदार विनायक राऊत यावेळी बोलताना म्हणाले.
हेही वाचा - राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली साडेसहा लाखांची दारू
हेही वाचा - 'नाॅन मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रीपद देण्याची वेळ आली तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव'