ETV Bharat / state

'तुझी आता बदलीच करतो'; खासदार विनायक राऊतांच्या पुत्राची पोलिसांना धमकी

गीतेश राऊत आणि त्याचा एक सहकारी हे आपल्या (एमएच ०२ एफइ 345) या अलिशान कारमधून दुपारी 3 वाजताच्या सुमारास मुंबईकडे जात होते. तेव्हा हा सर्व प्रकार घडला. व्हिडिओत त्याची सर्व कृत्य कैद झाली आहेत.

kankavali
खासदार विनायक राऊतांच्या पुत्राची पोलिसांना धमकी
author img

By

Published : Jul 17, 2020, 11:37 PM IST

Updated : Jul 18, 2020, 1:06 AM IST

सिंधुदुर्ग - शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत याने कणकवली मुख्य चौकात ड्युटीवर असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करत धमकी दिली. तुझी आता बदली करतो, तू मला ओळखत नाहीस, मी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा आहे आणि माझी गाडी अडवतोस काय? तुझी हिम्मतच कशी झाली. तुला माझा इंगा दाखवतोच, अशा भाषेत गाडीच्या काचा उघडून पोलीस कर्मचाऱ्यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला. ही सर्व घटना व्हिडिओत रेकॉर्ड झाली असल्याने खासदार पुत्राचे प्रताप आता जगजाहीर झाले आहेत.

खासदार विनायक राऊतांच्या पुत्राची पोलिसांना धमकी

महामार्ग चौपदरीकरणाच्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्यामुळे पर्यायी मार्गाने गाडी घेऊन जावी, अशी विनंती कणकवली पोलीस करत होते. याच दरम्यान मालवणहून मुंबईकडे जाण्यासाठी खासदार विनायक राऊत यांचे पुत्र गीतेश राऊत आणि त्यांचा एक सहकारी कणकवली चौकात आले. पहिल्या बॅरिकेटवर पोलिसांनी त्यांना पुढे रस्ता बंध असल्याने डाव्या बाजूला वळून पर्यायी मार्गाने पुढे जावे, असे सांगितले. मात्र, ऐकण्याच्या मनस्तीतीत नसलेल्या गीतेशने गाडी भरधाव पळवली तेव्हा पोलिसांनी दुसऱ्या बॅरिकेटवर अडवले. तेव्हा याचा पारा चढला आणि पोलिसांनाच शिवीगाळ करत आता तुला उचलतो, मी खासदार राऊत यांचा मुलगा आहे, तू ओळखत नाहीस, अशी धमकी देत भांडू लागला.

भर चौकात हा तमाशा चालू असलेला पाहून काही लोकांनी त्यांच्या या भांडणाचा व्हिडिओ केला आणि सत्यस्थिती उजेडात आली. एकीकडे संततधार पावसात पोलीस २४ तास ड्युटी करत असताना त्यांनाच धमकवण्याच्या आणि शिवीगाळ करत सोडणार नाही, अशी नाहक धमकी देण्याच्या प्रकारामुळे हा कोण म्हणून बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती.

गीतेश राऊत आणि त्याचा एक सहकारी हे आपल्या (एमएच ०२ एफइ 345) या अलिशान कारमधून दुपारी 3 वाजताच्या सुमारास मुंबईकडे जात होते. तेव्हा हा सर्व प्रकार घडला. व्हिडिओत त्याची सर्व कृत्य कैद झाली आहेत. अशा या खासदार पुत्रावर कारवाई करा, अशी मागणी समाजातून होत आहे.

Last Updated : Jul 18, 2020, 1:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.