ETV Bharat / state

दीपक केसरकरांचे खंदे समर्थक बबन साळगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर ? विधानसभा उमेदवारीची चर्चा

सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना राष्ट्रवादीकडून विधानसभा उमेदवारीची ऑफर असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

बबन साळगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर?
author img

By

Published : May 14, 2019, 1:24 PM IST

सिंधुदुर्ग - सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना राष्ट्रवादीकडून विधानसभा उमेदवारीची ऑफर असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. साळगावकर हे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे केसरकरांना मात देण्यासाठी राष्ट्रवादी ही खेळी खेळणार असल्याची राजकीय गोटात चर्चा आहे. तर या खेळीचा राणेंच्या स्वाभिमानालाही फायदा होऊ शकतो.

साळगावकर हे शिवसेनेच्या तिकिटावर सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. मात्र, गेले काही दिवस ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी वेळोवेळी स्वतंत्र भूमिका घेत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. त्यामुळे ते नेमके कुठल्या पक्षाचे? असा सवालही उपस्थित झाला आहे. दरम्यान, साळगावकर हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीतून निवडणूक लढतील, अशी चर्चा होती. मात्र, केसरकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर सिंधुदुर्गमध्ये राष्ट्रवादी पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच केसरकर यांना मात देण्यासाठी राष्ट्रवादीकडून व्यूहरचना आखली जात आहे. त्याच खेळीचा साळगावकर भाग असल्याचे बोलले जात आहे.

केसरकरांचे खंदे समर्थक समजले जाणारे साळगावकर हे स्वच्छ राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो. ४ ते ५ महिन्यांपूर्वी साळगावकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आंबोली येथे भेट घेतली होती. त्यानंतर पुन्हा साळगावकर यांची राष्ट्रवादीशी सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.

Intro:सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना राष्ट्रवादीकडून विधानसभा उमेदवारीची ऑफर असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. साळगावकर पालकमंत्री दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. केसरकरांना मात देण्यासाठी राष्ट्रवादी ही खेळी खेळणार असल्याची राजकीय गोटात चर्चा आहे. तर या खेळीचा राणेंच्या स्वाभिमानाला पण फायदा होऊ शकतो. Body:साळगावकर हे शिवसेनेच्या तिकिटावर सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. मात्र गेले काही दिवस ते नाराज असल्याची चर्चाच आहे. त्यांनी वेळोवेळी स्वतंत्र भूमिका घेत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. त्यामुळे ते नेमके कुठल्या पक्षाचे? असे सवालही उपस्थित झाले. दरम्यान साळगावकर हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीतून निवडणूक लढतील अशी चर्चा होती. मात्र केसरकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर घर घर लागलेली राष्ट्रवादी सिंधुदुर्गात पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच केसरकर यांना मात देण्याची देखील राष्ट्रवादीकडून व्यूहरचना आखली जात आहे. त्याच खेळीचा साळगावकर भाग असल्याचे बोलले जात आहे.Conclusion:केसरकरांचे खंदे समर्थक समजले जाणारे साळगावकर हे स्वच्छ राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो. चार ते पाच महिन्यापूर्वी साळगावकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आंबोली येथे भेट घेतली होती. त्यानंतर पुन्हा साळगावकर यांची राष्ट्रवादीशी सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान राष्ट्रवादीच्या या खेळीचा राणेंच्या स्वाभिमानला देखील फायदा होणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.