ETV Bharat / state

Aaditya Thackeray : 'संजय राऊतांवर झालेली कारवाई राज्यपालांनी केलेल्या...'; आदित्य ठाकरेंची टीका - आदित्य ठाकरे संजय राऊत अटक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राबद्दल जे उद्गार काढले आहेत, ते त्यांनी अनेकदा काढले आहेत. मात्र, त्यानंतर संजय राऊतांवर झालेली कारवाई ही राज्यपालांनी केलेले वक्तव्य झाकण्यासाठी सुरु आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली ( Aaditya Thackeray Attacks Governor Bhagatsingh Koshyari ) आहे.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray
author img

By

Published : Aug 1, 2022, 3:08 PM IST

Updated : Aug 1, 2022, 3:34 PM IST

सिंधुदुर्ग - देशात महागाई आणि बेरोजगारी आहे. पण, लोकांचे लक्ष फक्त राजकारण पक्ष आणि आणि त्यांचे आमदार फोडण्यावर आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राबद्दल जे उद्गार काढले आहेत, ते त्यांनी अनेकदा काढले आहेत. सावित्रीबाई फुले आणि मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसांबाबत असेल, हिंदुंमध्ये फुट पाडण्यासाठी ते काम सुरु आहे. मुंबई आणि ठाण्यात निवडणुका येऊन ठेपल्यात, तिथे ते मुद्दामन बोलत आहेत. मात्र, त्यानंतर संजय राऊतांवर झालेली कारवाई ही राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरुन दुर्लक्ष करण्यासाठी सुरु आहे, अशी टीका शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी केली आहे. कुडाळ मधील शिव संवाद यात्रे दरम्यान आदित्य ठाकरे बोलत ( Aaditya Thackeray Attacks Governor Bhagatsingh Koshyari ) होते.

  • There's inflation & unemployment. But the only thing people focus on is politics & breaking other parties & their MLAs. You know what Governor said recently. He deliberately took names of Thane & Mumbai where polls are going to be held:Shiv Sena's Aaditya Thackeray, in Sindhudurg pic.twitter.com/7k3TBlc4XX

    — ANI (@ANI) August 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'वार करायचा होता तर...' - मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी कोणाशीही भेदभाव केला, असे वाटलं नाही. शिवसेनेसोबत उद्धव साहेबांशी गद्दारी करत सरकार स्थापन करण्यात आलं. गद्दारी करणाऱ्यांना सर्वांना सगळे दिले. गोव्यात टेबलवर नाचणारे लोकप्रतिनिधी, तुमचा चेहरा होऊ शकतात का?, शिवसेनेचे उमेदवार म्हणून मतदारांनी त्यांना डोक्यावर घेतलं. बंडखोर आमदारांवर उपकार करुनही पाठीत खंजीर का खुपसला?, वार करायचा होता तर छातीवर करायचा होता. उद्धव ठाकरे आजारी असताना खंजीर खुपसला हे दु:ख आहे. काही जणांना महाराष्ट्राला खाली पाडायचे आहे. महाराष्ट्राचे 5 तुकडे करायचे आहेत, असा घणाघाती आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे.

'पक्ष फोडा, गद्दारी करा, ज्यांनी राजकीय...' - मंत्रिमंडळ विस्तावरुन आदित्य ठाकरेंनी शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात दोन लोकांचे जम्बो मंत्रीमंडळ आहे. काय चालले आहे कळत नाही. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विकास रखडला आहे. पक्ष फोडा, गद्दारी करा, ज्यांनी राजकीय ओळख दिली, त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसा, हे कधीही महाराष्ट्रात झालं नाही, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

'कोकण गद्दारांना क्षमा करणार नाही' - कोकणाने काय शिवसेनेला आणि ठाकरे परिवाराला साथ दिली. कोकणासाठी विकासाची कामे करत होतो, न्याय मिळत होता. शिवसेनेचा अर्थात कोकणचा आवाज मोठा होत होता. त्यामुळे कोकण गद्दारांना क्षमा करणार नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी कोकणातील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा - Case Against Sanjay Raut : संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.. स्वप्ना पाटकर प्रकरणात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Last Updated : Aug 1, 2022, 3:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.