सिंधुदुर्ग - केंद्रात व उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकार असूनही तेथे महिला सुरक्षित नाहीत, असा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश येथे एका दलित युवतीवर नराधमाकडून सामूहिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिच्यावर पोलिसांनीच परस्पर अंत्यसंस्कार केले. या घटनेचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटले असून जिल्हा शिवसेनेकडून कणकवली येथील शिवसेना कार्यालयासमोर भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकार विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सिंधुदुर्गात शिवसेनेकडून भाजप सरकारचा निषेध, हाथरस घटनेचे कणकवलीत पडसाद - सिंधुदुर्ग शिवसेना बातमी
महिलांवर होणाऱ्या सामूहिक अत्याचाराच्या घटना येत्या काळात थांबवण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी सरकारकडून अंमलबजावणी होण्याची गरज असल्याचे मत शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत यांनी हाथरस घटनेचा निषेध करताना व्यक्त केले.