ETV Bharat / state

सावंतवाडी नगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापनासाठी 'ॲक्शन प्लॅन' तयार

सावंतवाडी पालिकेच्या इतिहासात प्रथमच आपत्ती व्यवस्थापन ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी हा ४४ पानांचा हा प्लॅन तयार केला आहे.

Sawantwadi disaster management action plan
सावंतवाडी आपत्ती व्यवस्थापन ॲक्शन प्लॅन
author img

By

Published : Jun 21, 2020, 12:21 PM IST

सिंधुदुर्ग - सावंतवाडी शहरात आग, पूर, झाडे पडून आपत्ती ओढवल्यास तत्काळ उपाययोजना होण्यासाठी सावंतवाडी पालिकेच्या इतिहासात प्रथमच ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. सुमारे ४४ पानांचा हा प्लॅन आहे. यामध्ये नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी यांना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी नियुक्त करण्यात आले आहे. ही टीम आपत्तीच्या ठिकाणी पोहोचून परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

सावंतवाडी शहरात सुमारे ४० हजारहून अधिक लोकसंख्या आहे. १७ प्रभाग आहेत. ऐतिहासिक मोती तलाव आहे. दहा वर्षांपूर्वी मोती तलाव तुडुंब भरून वाहिला होता. त्याप्रमाणे जर तलाव भरुन वाहू लागला तर निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी यासाठी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या संकल्पनेतून प्रथमच आपत्ती व्यवस्थापन ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आहे.

शहरात मोती तलाव भरून पूरस्थिती ओढवली, बाजारपेठेत पाणी साचले. प्रभागात झाडे तुटून पडली, नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास, आग लागल्यास काय करायचे, यासाठी विभागवार नगरसेवक, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्त केलेली टीम काही वेळातच आपत्ती निवारणासाठी दाखल होणार आहे. नैसर्गिक आपत्तीतून नागरिकांना सावरणे हा या टीमचा हेतू आहे.

नागरिकांना हा ॲक्शन प्लॅन मोबाईलवर पाहता येणार आहे. या प्लॅनमध्ये नियुक्त टीमचे संपर्क क्रमांक असणार आहेत. या प्लॅनमुळे नैसर्गिक आपत्ती निवारणास मदत होणार आहे. या ॲक्शन प्लॅनच्या पुस्तिकेचे प्रकाशन नगराध्यक्ष संजू परब, मुख्याधिकारी संतोष जिरगे, न. पा. आरोग्य सभापती ॲड. परिमल नाईक, नासीर शेख यांनी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.