ETV Bharat / state

Nitesh Rane : संभाजी राजेंचे उपोषण मराठा आरक्षणासाठी की खासदारकीसाठी - नितेश राणे - संभाजी राजेंच्या उपोषणावर नितेश राणे

छत्रपती यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला आहे. यावेळी आक्रमक पवित्रा घेत, मराठा आरक्षणासाठी त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. (Nitesh Rane Comment On Sambhaji Raje) या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधत संभाजीराजांचे उपोषण मराठा समाजासाठी असावे ते खासदारकीसाठी नसावे असे म्हटले आहे.

भाजप आमदार नितेश राणे
भाजप आमदार नितेश राणे
author img

By

Published : Feb 27, 2022, 12:10 PM IST

Updated : Mar 15, 2022, 5:08 PM IST

सिंधुदुर्ग - संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला आहे. यावेळी आक्रमक पवित्रा घेत, मराठा आरक्षणासाठी त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. (Maratha Reservation) या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधत संभाजीराजांचे उपोषण मराठा समाजासाठी असावे ते खासदारकीसाठी नसावे असे म्हटले आहे.

व्हिडिओ

उपोषण स्वतःच्या खासदारकीसाठी असू नये

भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, त्यांचे उपोषण मराठा समाजासाठी आणि मराठा आरक्षणासाठी जरूर असावे. ते कायम ब्रेक के बाद आंदोलने करत असतात. आंदोलन करतात. (Nitesh Rane Comment On Sambhaji Raje) थांबतात विषय बाजूला गेले की पुन्हा आंदोलन करतात. त्यामुळे आता त्यांचे मराठा समाजासाठीच उपोषण असावे परंतु ते उपोषण स्वतःच्या खासदारकीसाठी असू नये, एवढेच माझे म्हणणे आहे, असे नितेश राणे म्हणाले.

आवश्यक तितकाच निधी वेळोवेळी सारथी संस्थेला वर्ग करू

राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणा बरोबरच या उपोषणाच्या माध्यमातून सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी निधी मागितला होता. ( Chhatrapati Sambhajirajes Fast Till Death ) मात्र, तो निधी एकदम न देता सारथीच्या विकासाचा आराखडा तयार करून त्याप्रमाणे अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. आवश्यक तितकाच निधी वेळोवेळी सारथी संस्थेला वर्ग करू, असे आश्वासनही सरकारकडून देण्यात आले होते. याप्रकरणी जागा हस्तांतर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

जलसंपदा विभागाची जागा यांचे प्रस्ताव शासनाकडे

कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग येथील मराठा युवकांसाठी विविध प्रकारचे उपक्रम या केंद्रातून सुरू करणे आवश्यक आहे. सारथीचा कारभार नव्याने सुरू झाल्यानंतर नाशिक येथे वसतिगृह इमारत प्रस्ताव, जागेचा प्रस्ताव, पुणे येथे पार्वती, एफसी रोड येथील जलसंपदा विभागाची जागा यांचे प्रस्ताव शासनाकडे गेले असून त्याचा हस्तांतर निर्णय झालेला नाही, अशा काही मागण्या त्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा - Face to Face: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याबाबत घोडे नेमके कुठे अडकले? मंत्री सुभाष देसाई म्हणाले...

Last Updated : Mar 15, 2022, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.