ETV Bharat / state

आमदार वैभव नाईक यांनी शेतात केली भात लागवड - vaibhav naik latest video

आमदार वैभव नाईक यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेचा सर्वाधिक लाभ कुडाळ मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. कालेली येथील शेतकरी गोविंद बाळकृष्ण परब यांनी घेतलेल्या भात लावणी मशीनच्या सहाय्याने आज त्यांच्या क्षेत्रावर भात लावणी करण्यात आली.

rice cultivation by mla vaibhav naik in sindhudurg
आमदार वैभव नाईक यांनी शेतात उतरत यांत्रिकीकरणाद्वारे केली भात लागवड
author img

By

Published : Jun 19, 2020, 9:19 PM IST

सिंधुदुर्ग - कुडाळ तालुका कृषी विभागामार्फत कालेली येथील शेतकरी गोविंद बाळकृष्ण परब यांच्या क्षेत्रावर कृषी यांत्रिकीकरणांतर्गत 'श्री' पद्धतीच्या भात लागवडीचा उपक्रम राबवण्यात आला. याचा शुभारंभ कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वैभव नाईक यांनी शेतात उतरत भात लावणी मशीन स्वतः चालवून लावणीचे प्रात्यक्षिक केले. कोणत्याही पदाचा बडेजाव न करता सर्वसामान्यांप्रमाणे वैभव नाईक शेतात उतरल्याने लोकांनाही याचे कुतूहल वाटले.

आमदार वैभव नाईक यांची यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड

आमदार वैभव नाईक यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेचा सर्वाधिक लाभ कुडाळ मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतला. कालेली येथील शेतकरी गोविंद बाळकृष्ण परब यांनी घेतलेल्या भात लावणी मशीनच्या सहाय्याने त्यांच्या शेतावर भात लावणी करण्यात आली. तसेच कालेली येथील मनोहर परब यांच्या क्षेत्रावर बांबु लागवड करण्यात आली. प्रभाकर घाडी यांच्या क्षेत्रावर काजू लागवडीची पाहणी करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हेत्रे, कुडाळ तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे, पंचायत समिती सदस्य मथुरा राऊळ, युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी, शिवसेना विभागप्रमुख रामा धुरी आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.