ETV Bharat / state

दिवाळी कालावधीत सिंधुदुर्गात जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची होणार कोरोना चाचणी - sindhudurg collector

आरोग्य यंत्रणेने जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांना कोरोना टेस्ट करण्याबाबत प्रबोधन करावे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी कोरोना टेस्ट करण्यासाठी यंत्रणा उभी करण्यात यावी. त्यासाठी प्रशिक्षितवर्ग उपलब्ध करण्यात यावा. कोरोनाची चाचणी करण्यासोबतच बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीची ऑक्सिजन पातळी, शरीराचे तापमान यांची तपासणी करण्यात यावी, असे आवाहन के. मंजुलक्ष्मी यांनी केले.

people who are coming to sindhudurg in diwali must go for corona test says collector
बैठकीत अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी
author img

By

Published : Nov 13, 2020, 3:06 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सध्या अटोक्यात आहे. दिवाळीचा सण सुरू झाल्याने मुंबई तसेच इतर भागातून जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या अधिक असते. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची कोरोना टेस्ट करा असे, आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहे. तसेच जिल्ह्यात आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टिजन टेस्ट वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या केएफडी (माकडताप) समन्वय समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.जे. नलावडे तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी करा -

आरोग्य यंत्रणेने जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांना कोरोना टेस्ट करण्याबाबत प्रबोधन करावे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी कोरोना टेस्ट करण्यासाठी यंत्रणा उभी करण्यात यावी. त्यासाठी प्रशिक्षितवर्ग उपलब्ध करण्यात यावा. कोरोनाची चाचणी करण्यासोबतच बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीची ऑक्सिजन पातळी, शरीराचे तापमान यांची तपासणी करण्यात यावी. हे सर्व काम करताना डॉक्टर्स, नर्स व इतर संबंधित कर्मचाऱ्यांनी स्वत:ची काळजी घेऊन काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

माकडतापाच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा

जिल्ह्यात कोरोनाची साथ आटोक्यात आली असली तरी माकडतापाची साथ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून माकडतापाच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले. जिल्हा रुग्णालयात मॉलिक्युलर लॅब तयार झाली आहे. सध्याचा काळ हा माकडतापाची साथ सुरू होण्याचा काळ आहे. त्यामुळे माकडतापाच्या (KDF) अनुषंगाने टेस्टिंगचे काम सुरू करण्यात यावे. त्यासाठी लागणारी उपकरणे व यंत्रणा सज्ज ठेवावी. साधन सामग्रीमध्ये काही उपकरणे कमी पडत असतील तर त्याचा प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडे तातडीने पाठविण्यात यावा. या साधनसामग्रीसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येईल, असे के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.

माकडतापासंबंधी औषधेखरेदी करण्यासाठी निधी पुरवणार -

माकडताप रुग्णांना लागणारी औषधे तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. औषधांचा साठा आरोग्य यंत्रणेकडे तयार असावा. औषधे खरेदी करण्यासाठीही जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येईल. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी माकड मृतावस्थेत आढळल्यास व ते कोणाच्याही निदर्शनास आल्यास संबंधितांनी 1077 या टोल फ्री क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा. यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.