ETV Bharat / state

'जात-धर्माच्या तटबंदी नाकारुन केवळ माणूस या भूमिकेतून लेखन व्हावे' - Sindhudurg Poet Convention

"आपलं जगणं आणि आपली कविता या दोन गोष्टी एकमेकांशी प्रामाणिक असतील तर आपली कविता निश्चितच साहित्य क्षेत्रात आपलं ठळक अस्तित्व निर्माण करते त्यासाठी कवीने स्वप्रेमातून बाहेर यायला हवे. जात-धर्माच्या बंदिस्त तटबंदी नाकारून केवळ माणूस या भूमिकेतून आपण काव्य लेखन करायला हवं. तरच आपल्या कवितेच्या कक्षा रुंदावत जातात.'' असे विचार कवी संमोलनात कवयित्री सरिता पवार यांनी मांडले.

सिंधुदुर्ग
online-poet-convention-in-sindhudurg
author img

By

Published : Oct 15, 2020, 8:09 AM IST

सिंधुदुर्ग- साहित्यानंद प्रतिष्ठानच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ऑनलाइन कवी संमेलन आयोजित केले होते. या कवी संमेलनात सिंधुदुर्गातील कवींनी कवितांतून मानवतेचा जागर केला. या कवी संमेलनात बुद्धांच्या अहिंसा, प्रेम, शांतीचा वारसा पुढे नेणाऱ्या धम्माच्या विचारांचे आजच्या जगाशी असलेले नाते सांगणाऱ्या आणि माणसातील माणूसपण ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या कवितांनी हे कविसंमेलन यशस्वी ठरले. "आपलं जगणं आणि आपली कविता या दोन गोष्टी एकमेकांशी प्रामाणिक असतील तर आपली कविता निश्चितच साहित्य क्षेत्रात आपलं ठळक अस्तित्व निर्माण करते त्यासाठी कवीने स्वप्रेमातून बाहेर यायला हवे. जात-धर्माच्या बंदिस्त तटबंदी नाकारून केवळ माणूस या भूमिकेतून आपण काव्य लेखन करायला हवं. तरच आपल्या कवितेच्या कक्षा रुंदावत जातात, असे विचार अध्यक्षीय मनोगतात कवयित्री सरिता पवार यांनी मांडले.
कवयित्री रिया पवार यांच्या " बाबा तुझ्या लेकरांत आता परिवर्तन घडतंय " या सकारात्मक भावना जागविणाऱ्या कवितेचा धागा पकडून " रंगांचा जन्म जातीजातीत कधी झाला ?" असा समाजव्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या अमोल तांबे यांच्या अस्वस्थ करणाऱ्या कवितेपर्यंत कविसंमेलन उत्तरोत्तर रंगत गेले. सध्याच्या समाजातील स्त्री अत्याचार हा स्वतःतील माणुसपणाला आवाहन करणारा ज्वलंत प्रश्न कवी श्रेयस शिंदे यांनी " हे देव्हाऱ्यातील आदिमाये " या कवितेतून अनोख्या पद्धतीने मांडला. आर्या बागवे यांच्या कवितेतील "तू नरकातच पडशील रक्तबंबाळ होऊन.. शाप आहे या कळीचा तुला " हा उद्वेग हृदयद्राव्यक होता. मनस्वी महादेव यांची "लॉकडाऊन मधील आई" सर्वांनाच बालपणीची आठवण देणारी होती. राकेश चौहान यांची "स्वातंत्र्याच्या भुवरती स्वीकारलेल्या गोड गुलामीत सुखावतोय" असे सांगणारी धीरगंभीर कविता अधांतरी समाजव्यवस्थेला संबोधित करणारी ठरली. ऋषिकेश अंकुशराव यांनी कोकण सोडून गेलेल्या लोकांबद्दल चीड व्यक्त करत "कोकण नगरी" ही कविता सादर केली. आदेश कदम यांनी "जागवा आता माणसांत एक एक बुद्ध" ही कविता आपल्या पहाडी आवाजात सादर केली. उदय सर्पे यांनी "जयभीमची सावली" या कवितेतून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. "जातीच्या आणि धर्माच्या पल्याड जाऊन कलाकाराने घ्यावा एकदा तरी मोकळा श्वास..." हा आशावाद जागवणाऱ्या कवितेने सागर कदम यांनी कवी संमेलनात आपली मोहोर उमटवली. तर अध्यक्षीय समारोपावेळी कवयित्री सरिता पवार यांनी आपल्या "दांभिक आस्तिकतेची द्वाही" या कवितेतून डोळस नास्तिकतेबाबत अंधश्रद्धाळू आस्तिक करत असलेल्या हस्तक्षेपांना माणुसपणाने सामोरे जाण्याची गरज अधोरेखित केली. या कविसंमेलनाचे प्रास्ताविक साहित्यानंद प्रतिष्ठानचे सिंधुदुर्गचे अध्यक्ष अमोल तांबे यांनी केले. सूत्रसंचालन राकेश चव्हाण यांनी केले. आभार सागर कदम यांनी मानले. या कवी संमेलनाला साहित्यानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय वडवेराव यांचे मार्गदर्शन लाभले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.