ETV Bharat / state

सिंधुदुर्ग : चारचाकी-दुचाकी अपघात, एकाचा मृत्यू

author img

By

Published : Mar 12, 2020, 11:24 AM IST

दारु वाहतूक करणाऱ्या भरधाव चारचाकीने माड्याचीवाडी येथे दुचाकीला धडक दिली. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघातग्रस्त वाहने
अपघातग्रस्त वाहने

सिंधुदुर्ग - दारू वाहतूक करणाऱ्या भरधाव चारचाकीने माड्याचीवाडी येथे दुचाकीला धडक दिली. यात एका अक्षय विलास राणे (वय 21) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातात चारचाकीचे समोरील चाक तुटले होते. चारचाकी चालकाने तसेच दीडशे मीटर गाडी चालवत गोडी जागेवर सोडून पलायन केले आहे.

यावेळी संतप्त ग्रामस्थांनी चारचाकी चालकाला अटक करण्याची मागणी करत रस्ता रोको केला. दरम्यान, या गाडीत गोवा बनावटीचे 50 दारूचे खोके आढळून आले.

हेही वाचा - चालत्या रेल्वेतून उतरताना कणकवलीत तरुण जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.